Share

मोठी बातमी! ‘या’ चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी प्रभासचा अपघात, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया, चाहते चिंतेत

Prabhas.j

बाहुबली फेम प्रभासचा नुकताच ‘राधे श्याम’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १७५ कोटींची कमाई केली आहे.त्यामुळे सर्व ठिकाणी प्रभासची चर्चा होत आहे. अशातच प्रभासच्या चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रभासला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(bahubali actor prabhas accident sallar set )

‘सालार'(Sallar) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर प्रभासचा अपघात झाला होता. त्यामुळे स्पेनमधील रुग्णालयात प्रभासवर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रभासला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. ही बातमी समोर येताच अभिनेता प्रभासच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रभास लवकर बरा व्हावा, यासाठी त्याचे जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. ११ मार्चला प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता.हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. अभिनेत्री पुजा हेगडे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

या चित्रपटावर तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण तिकीटबारीवर हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. अभिनेता प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रुती हसनची देखील मुख्य भूमिका आहे.

या चित्रपटाने तब्बल १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रशांत नील यांनी यापूर्वी ‘KGF’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘KGF’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याचा ‘KGF २’ हा चित्रपट १४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट देखील २०२३ वर्षामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सॅनॉन आणि अभिनेता सैफ अली खानची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. ओम राऊत यांनी यापूर्वी ‘तानाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लोकांनी जवानांवर केली दगडफेक, पोलिसांनी १५ जणांना घेतलं ताब्यात
भारताला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला, मिसाइल टेस्टिंगदरम्यान घडलं असं काही की..
भारतात ह्युंदाई लॉन्च करणार ‘ही’ मिनी एसयूव्ही, टाटा पंचला देणार टक्कर, वाचा किंमत आणि फिचर्स

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now