ING Vs ENG : पन्नाशीच्या आतच इंग्लंडचे चार प्रमुख मोहरे तंबूत

भारत आणि इंग्लडमध्ये चेन्नई येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला इंग्लडने पहिल्या डावात ३२९ धावांत गुंडाळले आहे. मात्र यानंतर इंग्लडच्या संघाची खराब सुरवात झाली आहे. दुसऱ्या दिवशीच्या उपहारापर्यत इंग्लडचे चार गडी तंबूत परतले आहेत.

इंग्लंडचा डाव सुरू होताच पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशांतने बर्न्सला बाद करत इंग्लडला पहिला झटका दिला. यानंतर डॉनिनिक सिबली आणि डॅनिअल लॉरेन्सला अश्विनने त्याच्या फिरकीवर तंबूत धाडले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्सर पटेलने पहिल्या कोसोटीत तुफानी धावा करणाऱ्या जो रुटला बाद केले आहे.

इंग्लंडला उपहारापर्यंत ४ बाद ३९ धावां अशीच मजल मारता आली आहे. यामुळे भारताने सामन्यावर मजबुत पकड बनवल्याचे दिसते आहे. आता इथून पुढच्या इंग्लिश फलंदाजांना मर्यादित धावसंख्येत रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.

पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३०० धावा केल्या होत्या. भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माच्या धमाकेदार १६१ धावांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. तसेच अजिंक्य रहाणे याने ६७ धावांची खेळी केली आहे. यानंतर आलेल्या रिषभ पंतने दमदार नाबाद अर्धशतक झळकवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs ENG : विराटलाही त्याने केलेल्या ‘त्या’ नव्या विक्रमावर विश्वास बसला नाही; पहा व्हिडीओ  
धडाकेबाज शतक झळकवत रोहितचे टीकाकारांना बॅटमधून चोख उत्तर
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात चारीमुंड्या चीत करत भारताने कसोटी मालिका जिंकली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.