Bachchu Kadu : एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर ते भाजपसोबत मिळाले आणि आपले सरकार स्थापन केले. त्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांनी मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं असं वक्तव्य केलेलं आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही कबुली दिली आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी गुवाहाटीला जाऊ नये असं लोकांना वाटत होतं. आमचे आमदार राजकुमार पटेल हे आधी गुवाहाटीला गेले. त्यानंतर मी गेलो होतो. पण मला शिंदेंसोबत बोलून गुवाहाटीवरून वापस यायच होतं.
पण ती वेळच अशी असते की, आलेला माणूस परत जावू द्यायचा नाही. राजकारणात हे होतच असतं, असे ते म्हणाले. तसेच आम्ही नगरसेवक घेऊन जातो तर आम्ही त्याला थांबवूनच ठेवतो. त्यामुळे हे राजकारण आहे, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
आमदार बच्चू कडू हे सध्या एका मुद्द्यावरून चर्चेत आहेत. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर ५० खोके घेतले असल्याचा आरोप केला होता. यावर आमदार रवी राणांनी १ तारखेपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावे, असे बच्चू कडू म्हणाले आहे. अन्यथा आम्ही राणांबाबत एक घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
त्यामुळे १ नोव्हेंबरला बच्चू कडूंची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील हा वाद अजूनही सुरूच आहे. त्यांच्यातील शाब्दिक वार काही केल्या थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पैसे दिले की, नाही याबाबत खुलासा करावा अशी मागणीही बच्चू कडूंनी केली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता बच्चू कडूंनी मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं असं वक्तव्य केलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या
BJP : “शिंदे-फडणवीस गुजरातचे एजंट आहे, ते उद्योग प्रकल्पांसाठी मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील”
Narayan Rane : चार आण्याच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो टाकणे पडले महागात
Pune : पुण्यातील राजकारणी इतके निर्लज्ज कसे? ‘त्या’ पार्टीनंतर नागरीकांचा संतप्त सवाल
MIM पक्ष उद्धव ठाकरेंसोबत युती करणार? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण