अमरावती, 19 मार्च : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा जिंकेल आणि शिवसेना शिंदे गट 48 जागा जिंकेल, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विचार करायला लावणारे वक्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडूंनी दिलेली प्रतिक्रीया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे, त्यांनी हे विधान चुकून केले आहे का, याची चौकशी व्हायला हवी. आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पण युतीबाबत आम्ही अद्याप काहीही ठरवलेले नाही.
युती करायची की नाही, आगामी विधानसभेत किती जागा द्यायच्या, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काळात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. ते अमरावती येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी युतीचा निर्णय झाला नसल्याचे सांगीतले.
दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत राहणार का, असे विचारले असता त्यांनी सूचक विधान केले. ते म्हणाले की पुढील दीड वर्षात काय होईल हे आताच सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलले. तीनदा शपथ घेतली गेली.
‘गॅरंटी कुणाचीच घेता येत नसते’, अशा शब्दात सूचक संकेत देत बच्चू कडू म्हणाले की पुढील दीड वर्षात काय होईल हे आताच सांगता येणार नाही. बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार का? पुन्हा सत्ताबदल होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईतील जिल्हा प्रचार प्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यासाठी जागा वाटपाची माहिती दिली. त्यावरून भाजपच्या मित्रपक्षांमध्ये मोठे वादंग निर्मान झाले होते
यावेळी ते म्हणाले की, भाजप 240 जागा लढवणार असून शिवसेनेला 48 जागा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर बावनकुळे यांच्या वक्तव्याने युतीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत म्हणून भाजपने या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला आहे.
बच्चू कडू हे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. पण शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्यासोबत अन्य १० अपक्ष आमदारांनाही मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे १० अपक्ष आमदारांना सोबत घेत बच्चू कडू काही खेळी करतात का याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..
शीतल म्हात्रे अश्लील व्हिडीओ प्रकरणात आदित्य ठाकरेंची एंट्री; दिली ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रीया
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना मिळणार हे माहित होतं कारण…; फडणवीसांनी दिली हैराण करणारी प्रतिक्रिया