Share

bachchu kadu : ‘हे’ मंत्रिपद तर नक्कीच मला मिळणार, कारण मला…; बच्चू कडूंना पुन्हा लागली मोठी आशा

bachchu kadu

bachchu kadu on minister position  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद, मनातील खदखद यांसारख्या अनेक गोष्टींमुळे काही आमदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज असल्याचीही चर्चा आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं होतं. पण भाजप-शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांनी मंत्रिपदाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळवारी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली आहे. त्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रायल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू चांगलेच खुश झाले आहे. आता याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिपदावरही भाष्य केले आहे.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाला मंजूरी देण्यात आली आहे. हे देशातील अशा प्रकारचं पहिलंच मंत्रालय आहे. आपण कुणासाठी काम केलं पाहिजे? असा संदेश यातून देण्यात आला आहे. ज्यादिवशी अर्थसंकल्पाचं पहिलं पान दिव्यांगांसाठी, विधवा महिलांसाठी, शेतकरी, मजूरांसाठी आणि वंचितांसाठी लिहिलं जाईल, तेव्हा देशाचं बजेट सर्वात सुंदर असेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मला वाटतं की मंत्रिपद न मिळाल्याचं दु:ख आता मी विसरुन गेलो आहे. नवीन सुखाची पाऊलवाट आता सुरु झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला आता मंजूरी मिळाली आहे. मला आत्मविश्वात आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्री बच्चू कडूच असेल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपद चुलीत घाला. तुम्ही फिरुन त्याच मुद्यावर येतात. माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्वाचं नाही. मंत्री तर मी होणारच आहे. कारण एकनाथ शिंदेंनी मला शब्द दिला आहे. पण आधी सेवा करु. दिव्यांगाच्या शेवटच्या घरापर्यंत पोहचू,

महत्वाच्या बातम्या-
ravish kumar : रवीश कुमार एनडीटीव्हीमधून पडले बाहेर, बुधवारी तडकाफडकी दिला राजीनामा
School : ८-९ वीत शिकणाऱ्या मुलांच्या बॅगेत सापडले कंडोम, सिगारेट आणि दारु; देशभरात उडाली खळबळ
Aftab statement : ‘मला फाशी झाली तरी पश्चाताप नाही, स्वर्गात मिळतील अप्सरा’; आफताबचे धक्कादायक विधान

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now