बच्चू कडूंचे आवाहन; ७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली आणि देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राजधानीत आठवडाभरापासून शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ८ तारखेला भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

 

या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठींबा दिला आहे. राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनासाठी मंत्री बच्चू कडू मोटारसायकलने प्रवास करत आहेत. चार दिवसांआधी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर परवा शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला आहे.

 

त्यानंतर शेतकऱ्यांचा मध्यप्रदेश मधील बैतुल मध्ये दुसरा मुक्काम होता. यासाठी बैतुल मध्ये एक मंगल कार्यलय बुक करण्यात आले होते. पण मध्यप्रदेश पोलिसांनी रहायला नकार दिल्याने शेतकऱ्यांनी तेथील शेतमाल असलेल्या वेअर हाऊस वर शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली.

 

यावेळी,  ७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ महत्त्वाचा आहे. तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.