मुंबई | हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडूंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः दिल्लीत येऊन आंदोलन करीन, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
चलो दिल्ली..
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा.
३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मि स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यासोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.#FarmersDilliChalo pic.twitter.com/296WvgEMCf— BACCHU KADU (@RealBacchuKadu) November 30, 2020
याबाबत ट्वीट करत बच्चू कडू म्हणतात, ‘केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करेन.’
पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी…
कृषी कायद्यांविरोधात सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांना रोखण्यात आलं असून इथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले, “कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला ज्या प्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आलं आहे. यावरुन असं वाटतं हे कोणी बाहेरुन आलेले शेतकरी आहेत देशातील नाहीत. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे. विशेषतः जे शीख आहेत आणि पंजाबमधून आले आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस कधी मिळणार? डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली वेळ
आत्महत्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट; पहा काय आहे पोस्टमध्ये
एकनाथ खडसे इन ॲक्शन! मोठा गैरव्यवहार उघड करणार; तेही पुराव्यासहीत