..आणि पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानाखाली, कारण वाचून धक्का बसेल

सर्वोपचार रूग्णालयातील कोरोनाच्या रूग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे सोमवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी अशी धक्कादायक माहिती समोर आली की आठ महिन्याच्या धान्यसाठ्याची नोंदच नाहीये.

या प्रकरणानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना देण्यात आली. बच्चू कडू यांनी मेसची पाहणी केली आणि चाचपडताळणी केली. सर्वात आधी त्यांनी मेसमध्ये उपलब्ध असलेल्या धान्यसाठ्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांना लक्षात आले की ८ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंदच नाहीये.

यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याला काहीच सांगता आले नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची सुचना दिली. संबंधित पुरवठादाराकडून केवळ ८ दिवसाचेच धान्य पुरविण्यात येत होते.

यासंदर्भात संबंधित कर्मचारी म्हणाला की, मूग आणि तूर डाळ मिळून दररोज २३ किलो लागत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान हाच प्रश्न कडू यांनी स्वयंपाकीला विचारला असता त्यांनी दोन्ही डाळी मिळून आठ ते दहा किलोंचा उपयोग होतो असे सांगितले. त्यानंतर आकड्यांमध्ये घोळ आढळल्याने पालकमंत्र्यांनी स्वयंपाकीच्या कानशिलात लगावली.

त्यानंतर बच्चू कडू यांनी या प्रकरणावर चौकशी बसविण्याचे आदेश दिले. तसेच त्या स्वयंपाकीवर निलंबनाची कारवाई करण्यास सांगितली. चौकशीच्या सुचना त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना दिल्या. तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही अतिरीक्त चौकशी करण्यास सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या
परमीरसिंगांचे सचिन वाझेशी जवळचे संबंध, त्यांनीच वाझेची नियुक्ती केली; आयुक्तांचा अहवाल फुटला
दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी
..आणि त्याने मावशीसोबत पळून जाऊन केलं लग्न, आता मुलगाच बनला बापाचा साडू
..आणि त्याने मावशीसोबत पळून जाऊन केलं लग्न, आता मुलगाच बनला बापाचा साडू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.