मुंबई | गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अशातच अलीकडे या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला संतापून कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे,’ असे कटारिया यांनी म्हटले होते.
याचाच धागा पकडत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री रतनलाल कटारीया यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.रतनलाल कटारीयांनी तात्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा ईशारा राज्यमंत्री बच्चू कडु यांनी दिला आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, कटारिया यांनी शेतकऱ्यांबाबत हे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरायची भाषा वापरत असालं तर मग आम्ही तुम्हाला मारण्यासाठी यायचं का ? असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य…
हरीयाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपुजन करण्यासाठी आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला संतापून कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे,’ असे कटारिया यांनी म्हटले होते.
तसेच काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देव सद्बुद्धि देवो अशी मी हात जोडून प्रार्थना करतो असंही म्हटले आहे. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कटारिया हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले असता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.
महत्त्वाच्या बातम्या
‘…तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वात मोठा विश्वासघात ठरेल’
नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळेल; AIIMS च्या संचालकांची माहिती
‘मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की काय?’