राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का? बच्चू कडू आपल्याच सरकारवर आक्रमक

अमरावती | राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय? असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे.

तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.

याचबरोबर ‘ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे”, असे बच्चू कडू म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.