माणूसकीला काळिमा! नवजात मुलीचे पाय उलटे असल्यामुळे आईवडिलांनी काढला रुग्णालयातून पळ

आजही देशात अनेक अंधश्रद्धा आहे. काही लोकांचा भुता खेतांवरही विश्वास असतो. असे म्हणतात की भुताचे पाय उलटे असतात. पण मध्य प्रदेशात एका नवजात बालकाचेच पाय उलटे असल्याची घटना घडली आहे.

आपल्या नवजात मुलीचे पाय उलटे असल्याचे पाहून घाबरलेल्या आई-वडिलांनी त्या रुग्णालयातून पळ काढला आहे. या मुलीच्या दोन्ही पायाची बोटं हे मागच्या दिशेने आहे. आतापर्यंतच्या वैद्यकीय शास्त्रात ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.

भारतात असे क्वचितच घडले आहे. पण यामागेही वैज्ञानिक कारण आहे. मात्र लोकांच्या मनात अंधश्रद्धा असल्याने अशा मुलीच्या जन्मामुळे पुर्ण परीसरात खळबळ माजली आहे. त्यामुळे जन्मदात्या आई-वडिलांनीही त्या मुलीचा त्याग केला आहे.

मध्य प्रदेशच्या हरदा इथल्या खिरकिया ब्लॉकमधील झांजरी इथे ही घटना घडली आहे. या परीसरात राहणाऱ्या विक्रम नावाच्या माणसाच्या पत्नीला सरकारी रुग्णालयात एक मुलगी झाली आहे. पण प्रसुतीनंतर त्या मुलीचे दोन्ही पाय उलटे असल्याचे लक्षात आले.

ही माहिती डॉक्टरांनी त्या मुलीच्या आई-वडिलांना दिले, पण घाबरलेल्या आईवडिलांनी त्या मुलीला रुग्णालयातच टाकून पळ काढला आहे. आईवडिलांच्या अज्ञानामुळे आणि अंधश्रद्धेमुळे मुलीला आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित राहावे लागले आहे.

या घटनेवर डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. ही घटना अतिशय दुर्मिळ असल्याने डॉक्टरांसोबतच नर्सदेखील आश्चर्यचकित झाल्या आहे. सर्वसामान्य बाळांपेक्षा या बाळाचे वजन कमी आहे. या मुलीचे वजन फक्त १.६ किलो आहे. तसेच आईवडिलांनी जरी पळ काढला असला, तरी बाळाची काळजी रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस घेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कुत्र्यावर इतका भयानक अत्याचार; व्हिडिओ पाहून जॉन अब्राहमची पण उडाली झोप
देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट, दिव्या सिंग मालिकेतून होणार बाहेर, आता होणार ‘ही’ नवीन एन्ट्री
काय सांगता! ATM मध्ये १४०० रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री, जाणून घ्या….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.