Share

महामानवाला अनोखे अभिवादन! भाकरीवर रेखाटले बाबासाहेबांचे चित्र, फोटो तुफान व्हायरल

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे. यामध्ये आता भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अनोख्यारित्या बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

यामुळे याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र काढले आहे. यामुळे याचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कलाशिक्षक लोहार यांनी 9 इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र काढून त्यांना अभिवादन केले आहे.

दादरच्या चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आहेत. राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने काटेकोर नियोजन केले आहे. रेल्वेने देखील महापरिनिर्वाण दीना निमित्त विशेष लोकल सोडल्या आहेत.

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्याचे भाषा वैभव, त्या लेखनामागचा त्यांचा विचार आजही वाचकाला थक्क करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले पहिले न्यायमंत्री होते.

डॉ. आंबेडकर हे पहिले असे भारतीय होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रातील पहिले डॉक्टरेटची पदवी मिळवली. आंबेडकरांनी दलितांच्या आणि मागासवर्गीय लोकांच्या प्रगतिकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला होता.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या काही रंजक गोष्टी…

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आईवडिलांचे १४ वे मुल आणि शेवटचे मुल होते.

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामगार होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडील ब्रिटिश इंडियन आर्मीत होते.

३) डॉ. आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावडेकर होते, पण त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांचे नाव शाळेलचे रेकॉर्डमध्ये आंबेडकर असे टाकले होते.

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये दोन वर्षे प्रिन्सिपल होते.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानात असलेल्या कलम ३७०, ज्यात जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे त्याच्या विरोधात होते.

६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे भारतीय आहेत, ज्याचे प्रतिमा लंडन संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत लावण्यात आली आहे.

७) भारताच्या तिरंग्यात अशोक चक्र लागण्यामागचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच दिले जाते.

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर Labor Member of the Viceroy’s Executive Council चे सदस्य होते. त्यांनीच नियमात बदल करून कारखान्यात १४ तास काम करण्याचा नियम ८ तासांवर आणला होता.

९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी महिला कामगारांसाठी विशेष कायदे बनवले. ज्यात Maternity Benefit for women Labor, Women Labor welfare fund, Women and Child, Labor Protection Act सारखे कायदे आहेत.

१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. असे म्हटले जाते डॉ. आंबेडकरांचे ग्रंथालय हे जगातले सगळ्यात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय आहे. ज्यात ५० हजारांपेक्षा जास्त पुस्तकं होती.

११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन लग्न झालेले होते. पहिले लग्न १५ वर्षाचे असताना ९ वर्षीय रमाबाई यांच्यासोबत. दुसरे लग्न रमाबाई यांच्यासोबत. रमाबाई यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकटे पडले होते. त्यामुळे वयाच्या ५७ व्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ. शारदा कबीर यांच्याशी लग्न केले होते.

महत्वाच्या बातम्या
वसंत मोरेंचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश? अजितदादांच्या ऑफरवर तात्या स्पष्टच बोलले, म्हणाले..
KL Rahul : ‘मी बॅटने धावा केल्या तर फिल्डींगने सामना हरवेल’; पराभवानंतर भडकलेल्या चाहत्यांनी उडवली राहूलची खिल्ली
Rohit Sharma : ‘आम्हाला याची सवय झालीय…’, बांगलादेश विरूद्धच्या पराभवावर रोहित शर्माचे हैराण करणारे वक्तव्य

ताज्या बातम्या इतर तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now