बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातील..

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने राज्यभरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी त्यांच्या आठवणी सोशल मीडिायातून जागवल्या होते. आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एक विधान केले आहे.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक व्यक्ती ३० वर्ष आपल्या इथे राहून सर्व व्यवस्था समजून, परदेशात गेला. मात्र त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातील काही जाणकार लोक जपान किंवा इतर देशात का पाठवले नाहीत? जर महाराजांनी तिथे आपले काही लोक पाठवले असते तर तेथील तंत्रज्ञानाची अधिक माहिती मिळाली असती, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

महाराजांनी जाणकार लोकांना परदेशात पाठवयाला पाहिजे होते असं आजही वाटतं. मात्र त्यांनी ती का पाठवली नाहीत याच मला नवल वाटतं, अशी भावनाही पुरंदरे यांनी व्यक्त केली. महाराजांनी असं केलं असतं तर पुढील पिढीला आणखी फायदा झाला असता, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्याच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आहेत. ते कुठल्या गल्लीतले, बोळातले, जातीतले, धर्मातले नाहीत. तर ते जगाचे आहे.

त्याहीपेक्षा सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत शिवाजी महाराजांचे चरित्र मार्गदर्शक ठरणारे असून शिवाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय विचार दिला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक, घरीच उपचार सुरू

छोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’ मालिकेत करणार काम

चक दे इंडिया! ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पहा निर्णायक गोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.