भारतीयांनो आपण एकत्र येण्याची हीच ती वेळ; पाकीस्तानचा कर्णधार बाबर आझमचे मोठे वक्तव्य

राज्यातच नाही तर पुर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. देशभरात भयंकर परिस्थिती असताना परदेशी खेळाडू भारतासाठी प्रार्थना करताना दिसून येत आहे.

आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने भारतासाठी प्रार्थना केली आहे. त्याने ट्विट करुन भारतातील भयंकर स्थितीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. याआधी पाकीस्तानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदीने पण भारतीयांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या या संकट काळात भारतातील लोकांसाठी मी प्रार्थना करतो. हा काळ एकजूट दाखवण्याचा आणि प्रार्थना करण्याचा आहे. लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, हे मी आवाहन करतो. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे. याचा आपण सर्वांनी मिळून सामना करु, असे ट्विट बाबर आझमने केले आहे.

बाबर आझमने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला होता, त्यामुळे तो चर्चेत आला होता. बाबरने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टि-२० सामन्यात विराटचा सर्वात जलद २००० धावांचा विक्रम मोडला आहे. त्याने फक्त ५२ आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यात २००० धावा केल्या आहेत, तर विराटने २००० धावा ५६ सामन्यांमध्ये केल्या होत्या.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्याने पाकिस्तानी चाहत्यांना भारताच्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन केले होते.

कोणत्याही सरकारला संकटाचा सामना करणे अशक्यच आहे. मी माझ्या सरकारला आणि चाहत्यांना आवाहन करतो की भारताला मदत करा. भारताला सध्या ऑक्सिजन टँकरची गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भारताला निधी मिळवून देण्यासाठी दान करा आणि ऑक्सिजन टँक्स त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन शोएब अख्तरने युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करत केले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो
“पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे पॅट कमिन्सने दाखवून दिले आहे”
रिक्षा चालवून, संत्री विकून झाला करोडपती; गरीबीची जाणीव ठेवत आता पुरवला ४०० टन ऑक्सिजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.