भाजपचे माजी मंत्री लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावले; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई | भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बबनराव लोणीकर यांनी परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू अशी धमकी दिल्याचे या कथित ऑडियो क्लिपमध्ये आहे.

लोणीकर यांनी परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू अशी धमकी दिल्याचे या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टिप मिळाली होती यानंतर हा कॉल केला गेला आहे.

याचबरोबर या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना ऐकायला मिळत आहे. कोर्टाच्या आदेशाशिवाय व्यापाऱ्यांच्या घरात घुसता कसे? असा सवाल लोणीकर यांनी आयपीएल अधिकाऱ्यांना केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर लोणीकर त्यांनी विधानसभेत तुम्हाला उलटं टांगील सगळ्यांना अशी धमकी दिली.

दरम्यान, ‘एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरावर कारण नसताना धाड का टाकता, तुमच्याकडे कोर्टाची परवानगी होती का, असा सवाल या कथित ऑडिओ क्लिपमधून लोणीकर विचारत आहे. तसेच याबाबत लोणीकर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितली. त्यामुळे आता हा विषय संपला आहे, असेही लोणीकर म्हणाले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
”अब्दूल सत्तार तुझ्यासारखे लोकं आमची गाडी धुवायला असतात, औकातीत रहा”
विद्या बालनने भाजप मंत्र्याच्या ‘त्या’ ऑफरला नकार दिल्याने दादागारी करत शुटींग पाडले बंद
मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ही ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.