Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव हे मुरादाबादमध्ये आर्य समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ड्रग फ्री इंडिया या विषयावर भाष्य केले. यावेळी बोलत असताना बाबा रामदेव यांनी अनेक अभिनेत्यांवर भाष्य केले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांची नावे घेत त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
बाबा रामदेव यांनी शनिवारी मुरादाबादमध्ये व्यासपीठावरून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. यावेळी यांनी शाहरुख खान आणि सलमानचे उदाहरण देत संपूर्ण फिल्म इंडस्ट्री ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला. बाबा रामदेव यांनी बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटसृष्टीवरही ड्रग्जच्या संदर्भात जोरदार हल्लाबोल केला.
बाबा रामदेव म्हणाले की, शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज सेवन करताना पकडला गेला. तसेच सलमान खानही ड्रग्ज घेतो. आमिर घेतो की नाही ते माहित नाही. आज संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री ड्रग्सच्या कचाट्यात सापडली आहे, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या वेळी ड्रग्ज आणि दारू वाटली जाते असेही ते म्हणाले.
तसेच बाबा रामदेव यांनी व्यासपीठावरून सर्वांना आवाहन केले. ते म्हणाले की, आपल्यापैकी कोणीही बिडी, सिगारेट, दारू पिऊ नये हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यामध्ये आर्य समाजाने केलेल्या कामाची सर्वाधिक गरज असल्याचे ते म्हणाले.
बॉलीवूडचा ड्रग्जशी संबंध असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये ड्रग्जच्या चर्चांना उधाण आले. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला देखील ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. बाबा रामदेव यांनी त्यांच्या भाषणात हेच उदाहरण दिले.
याआधीही बाबा रामदेव यांनी बॉलीवूडवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी परत अभिनेत्यांचे नाव घेत आरोप केले आहेत. त्यामुळे आता बाबा रामदेव यांचे हे वादग्रस्त विधान चर्चेचा विषय बनले आहे.
महत्वाच्या बातम्या
बाबा रामदेव यांच्या कार्यक्रमावरून परतताना झाला भीषण अपघात, कुटुंबातील 5 जणांचा मृत्यु
महागाईच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव; म्हणाले, काय करायचंय ते करून घे, शांत राहा, नाहीतर..
बाबा रामदेव यांच्या ‘या’ कंपनीने दिला गुंतवणूकदारांना तब्बल ४९५८ टक्के परतावा; १ लाखाचे झाले ५० लाख
Ramdev Baba: एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे गौरव पुरूष, तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार; रामदेवबाबांची स्तुतीसुमने