बाबा रामदेव उतरले ई कॉमर्स क्षेत्रात; देणार फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला टक्कर

देशात ई कॉमर्स क्षेत्रात पण मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढत चालली आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यातील स्पर्धा दिवसेंदिवस अजूनच तंगडी होत चालली आहे. स्वामी रामदेव हे पण आता ई कॉमर्स क्षेत्रात उतरणार असल्याचे समजते आहे.

पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी म्हटले आहे की, पतंजलीचे योग भवन यावेळी आरोग्य भवन बनले आहे. ते पतंजलीचे प्रोडक्ट ई कॉमर्स माध्यमातून विक्रीस आणणार असल्याचे समजते आहे. बऱ्याच भागात लोकांना सध्याच्या स्थितीत उत्पादन घेता येत नाही.

लोकांना सध्याच्या स्थितीत उत्पादन घेता येत नसल्यामुळे पतंजलीने ई कॉमर्स माध्यमात उतरण्याचे ठरवले आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांना टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांनी पतंजली ऑर्डर मी वर घेणे सुरु केले आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी पुढे म्हटले आहे की, स्वदेशी स्मृती कार्ड औषधांवर १० टक्के सूट मिळणार आहे. पतंजलीचे ३०० ते ४०० गारमेंट यावर खरेदीसाठी उपलब्ध होतील. पतंजली सर्व प्रकारचे प्रोडक्ट यावर विक्रीस ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

फॉर्मल कपड्यांपासून ते कपडे आणि चप्पल पर्यंत सर्वच एका ठिकाणी ग्राहकांना मिळणार आहे. पतंजलीचे कपडे पण सर्व ग्राहकांना ५०% कमी किंमतीती उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या काळात लोकांची प्रतिकार शक्ती वाढणे गरजेचे आहे.

त्यामुळे पतंजलीने प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीचे पण प्रोडक्ट मार्केट मध्ये आणले आहेत. ग्राहक आर्डर मी वर यासंबंधात प्रोडक्ट पण खरेदी करू शकणार आहेत. किराणा सामनापासून ते ज्यूस पर्यंत सर्व सामान यावर उपलब्ध होणार आहे.

ताज्या बातम्या
कर्मचाऱ्याने ऑफिसला गैरहजेरीचे दिले विचित्र कारण; स्वतःला भगवान विष्णूचा दहावा अवतार सांगितला

माधुरी दीक्षितने शेअर केला विना मेकअपचा फोटो, फोटो पाहून चाहत्यांना विश्वासच बसेना, म्हणाले..

अवघ्या तीन गुंठ्यांत फुलवला ७५ प्रकारच्या पिकांचा शेतमळा, भांगे कुटुंबियांच्या अनोख्या शेती मॉडेलची चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.