लाखो कोरोना रुग्णांचा ऍलोपॅथीमुळे मृत्यु झाला आहे; बाबा रामदेव यांचे खळबळजनक वक्तव्य

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र धडपड करत आहे. त्यामध्ये १२०० पेक्षा डॉक्टरांनी आपले बलिदान दिले आहे.

डॉक्टरांमुळेच आतापर्यंत अनेक रुग्णांचे जीव वाचले आहे, तर लाखो रुग्णांना बरे होऊन घरी जाता आले आहे. असे असताना बाबा रामदेव यांनी धक्कादायक विधान केले आहे. ऍलोपॅथीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यु झाला आहे, असे धक्कादायक विधान बाबा रामदेव यांनी केले आहे.

रामदेव बाबांनी विज्ञानाला मुर्ख म्हणत विज्ञानावर अविश्वास दाखवला आहे. सर्वात आधी हायड्रोक्लोरोक्विन फेल ठरले. त्यानंतर प्लाझ्मा थेरेपी आणि रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबिफ्लु फेल ठरले आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

आज लाको लोकांचा मृत्यु ऍलोपॅथीमुळे झाला आहे. आज जेवढ्या लोकांचा मृत्यु ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाला आहे, त्यापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यु ऍलोपॅथीमुळे झाला आहे, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बाबा रामदेव यांच्या खळबळजनक विधानानंतर देशभरातून त्यांना विरोध करण्यात आला आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच बाब रामदेव यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी एक तर बाबा रामदेव यांचा हा आरोप स्विकार करावा आणि आधूनिक उपचारपद्धती बंद करावी, नाहीतर बाबा रामदेव यांच्यावर कठोर कारवाई करत, साथरोग नियंत्रण कायद्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयएमएने केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: संतापलेल्या सांडाच्या अंगावर जाऊन बसला तरुण; पठ्ठ्याची करामत पाहून तुम्ही पण ठोकाल सलाम
“उध्दव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं; तेच खरे शिवसैनिक, त्यांच्याकडून काहीतरी शिका”
देशातील लसीच्या तुडवड्याला केंद्र सरकारच जबाबदार; सिरम इन्स्टिट्युटने केला खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.