पतंजली देणार पाच लाख तरुणांना रोजगार; बाबा रामदेव यांची घोषणा

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर योग गुरू बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘देशात पॉम ऑईलचे उत्पादन वाढल्यानंतर पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. भारताला जगातील सर्वात मोठे मॅन्यूफॅक्चरिंग बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण झाले, तर अनेकांना रोजगार मिळेल.

तसेच ‘मी स्वतः आजवर पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. ज्या पद्धतीने इंडोनेशिया आणि मलेशियावरून आपल्याला पॉम मागवावे लागते, त्याचे उत्पादन भारतातच वाढले, तर देशाचे दोन लाख कोटी रुपये वाचतील आणि पाच लाखहून अधिक लोकांना तर स्वतः स्वामी रामदेवच पतंजलीच्या माध्यमाने रोजगार देतील, असेही बाबा रामदेव म्हणाले.

दरम्यान, बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे म्हटले आहे. या अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘मोदी सरकार म्हणजे खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’
…म्हणून विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खास; जाणून घ्या या नावामागचा अर्थ
पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे म्हणणाऱ्या शिक्षकांना अजित पवारांनी ‘या’ शब्दांत खडसावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.