रामदेव बाबांच्या कोरोनीलला देशभरात विक्रीसाठी परवानगी मिळाली, पण ह्या अटीवर..

 

देहरादून | पतंजलीच्या कोरोनील या औषधावर लावलेला प्रतिबंध आता मागे घेण्यात आला आहे. पण यासाठी सरकारने घालून दिलेल्या अटीनुसार यांची विक्री करता येणार आहे.

पतंजलीला आता हे औषध कोरोना बरे करणारे औषध असल्याच्या नावाने विकता येणार नसल्याची माहिती आयुष मंत्रालयाने दिले आहे.

या औषधाला प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधाच्या रूपात विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आजपासूनच हे औषध देशभरात विकले जाऊ शकते.

या आयुर्वेदिक औषधाला पतंजलीने २३ जूनलाच लॉन्च केले होते. पण नंतर सरकार कडून याच्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे याची विक्री करण्यात अडथळा आला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.