भुसारेंच्या मुलींच्या लग्नात मामा म्हणून उभे राहिले बाबा पठाण; सासरी जाताना ढसाढसा रडल्या पोरी

 

बीड | मानलेल्या बहिणीच्या मुलींचे कन्यादान करून त्यांना सासरी पाठवताना रडणाऱ्या एका मुस्लिम बांधवाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा माणुस दुसरा तिसरा कोणी नसून बोधेगाव येथील बाबाभाई पठाण आहे. याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या गोष्टीची दखल घेतली होती, तसेच धार्मिक सलोख्यावर हा माझा भारत, असे ट्विट आव्हाड केले आहे.

बोधेगाव तालुका शेवगाव येथील भुसारे-तट्टू परिवारातील दोन मुलींच्या म्हणजेच गौरी आणि सावरी यांच्या लग्नातील सोहळा मामांच्या हस्ते विधिवत कन्यादानाचा कार्यक्रम पार पडला आहे.

मुलींच्या आईला सख्खा भाऊ नसल्याने त्यांनी बाबा पठाण यांना भाऊ मानले आहे. तसेच दर राखी पौर्णिमेला बाबा पठाण हे त्यांच्याकडून आवर्जून राखी बांधून घेतात.

बाबा पठाण आणि गौरी, सावरी, आणि भाऊ करण यांचे मामा भाच्यांचे नाते जातीभेदाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे या मुलांना बाबा पठाण कधी वेगळ्या जातीचे वाटलेच नाही, हीच जबाबदारी बाबा पठाण यांनी मामा म्हणून पार पाडली आहे.

दरम्यान, बाबा पठाण गावाच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात. गेल्या वर्षी सप्ताहाला देणगी देताना तसेच शिवजयंतीला भगवा घेऊन सगळ्यात पुढे उभे राहतानाचे बाबा पठाण यांचे फोटो व्हायरल होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.