बाबा का ढाबाला युट्युबर गौरव वासनने दिली भेट, बाबा त्याच्या गळ्यात पडून रडले आणि म्हणाले..

नवी दिल्ली । दिल्लीच्या ‘बाबा का ढाबा’ बद्दल सर्वांना माहीती आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे मालवीय नगर परिसरातील रस्त्याच्या कडेला ढाबा चालवणाऱ्या ‘बाबा के ढाबा’चा मालक कांता प्रसाद यांचे जीवन बदलले होते.

जगभरात ‘बाबा के ढाबा’ला मान्यता देणाऱ्या यू ट्यूब गौरव वासनने आता कांता प्रसादशी आपले नाते सुधारले आहे. बाबांची माफी मागितल्यानंतर गौरव सोमवारी त्यांच्या ढाब्यावर गेला आणि कांता प्रसाद यांना भेटला आणि म्हणाला की आता आमचे पूर्वीसारखे नाते झाले आहे. कांता प्रसादने यापूर्वी एका व्हिडिओमध्ये गौरव वासनची माफी मागितली होती.

या व्हिडिओमध्ये बाबा दुमडलेल्या हातांनी उभे आहेत. हे पाहिल्यानंतर गौरव वासन त्याला भेटायला आला आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. या दोघांमधील भेटीनंतर गौरव म्हणाला, की चुका करणाऱ्यापेक्षा जो माफ करतो तो नेहमीच मोठा असतो, हे माझ्या पालकांनी मला शिकवले आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

सोमवारी गौरव वासन बाबांना भेटायला त्यांच्या ढाब्यावर पोहचला तेव्हा कांता प्रसादच्या डोळ्यात अश्रू आले होते. बाबांना त्यांची चूक लक्षात आल्यामुळे ते दोघेही रडले. बाबा म्हणाले की, जर गौरव नसता तर आज मला कोणी ओळखले नसते, मला आणि माझ्या ढाब्याला ही मान्यता त्याच्यामुळे मिळाली आहे आणि त्याच्यासाठी मी माझे प्राणही देऊ शकतो. कांता प्रसाद इतके भावनिक झाले होते की, ते गौरवचे पाया पडू लागले. मात्र गौरवने त्यांला रोखले आणि म्हटला की, तुम्ही माझ्यापेक्षा वयस्कर आहात आणि मी नेहमीच तुमचा आदर करतो.

लॉकडाऊननंतर, ‘बाबा का ढाबा’ ला ऑक्टोबर २०२० मध्ये मान्यता मिळाली तेव्हा जेव्हा गौरवने ढाब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जो भयंकर व्हायरल झाला. यानंतर वृद्ध जोडप्यास मदत करण्यासाठी बरेच लोक पुढे आले आणि बाबांना लाखो रुपयांची आर्थिक मदत केली गेली. यानंतर बाबांनी त्या पैशातून स्वत: चे रेस्टॉरंट सुरू केले.

कांत प्रसादने गौरव वासनवर फसवणूकीचा आरोप केला तेव्हा या कथेला एक नवीन वळण लागले होते. पैशांच्या गैरव्यवहारावरून दोघांमध्ये भांडण झाले. एवढेच नव्हे तर कांता प्रसाद यांनी गौरवविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. त्यानंतर कांता प्रसाद यांचे रेस्टॉरंटही चालत न्हवते आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले होते.

ताज्या बातम्या

VIDEO: फटाकांच्या आवाजांमुळे हत्ती संतापला, वरातीत आलेल्या लाखो रुपयांच्या गाड्यांचा केला चुराडा

सोलापूरमध्ये अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण २४ तासांत होतोय बरा

तु अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस; हटके लुकमुळे अभिनेत्री प्रियंका उध्वानी झाली ट्रोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.