VIDEO: गौरव वासन चोर नव्हता आणि नाही, त्याने…; बाबा का ढाबाच्या बाबांनी मागितली माफी

गेल्यावर्षी बाबा का ढाबा चांगलाच चर्चेत आला होता. ग्राहक नसल्यामुळे त्यांची व्यथा एका युट्युबरने लोकांपर्यंत मांडली होती. त्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात या ढाब्याला मदत केली होती. आता मात्र हा ढाबा पुन्हा चर्चेत आला आहे.

हा ढाबा चालवणारे कांता प्रसाद पुन्हा त्यांच्या जुन्या ढाब्यावर परतले आहे. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ज्या युट्युबरने त्यांची मदत केली होती, त्याच युट्युबरची ते माफी मदत मागताना दिसून येत आहे.

गौरव वासन, तो मुलगा चोर नव्हता. ना आम्ही त्याला कधी चोर म्हटले. आमच्याकडून एक चुक झाली आहे, त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. आमच्याकडून चुक झाली आहे, त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. आणि जनतेशी पण माफी मागत आहोत की, काही चुक झाली असेल, तर आम्हाला माफ करा, असे कांता प्रसाद म्हणत आहे.

याआधी कांता प्रसाद यांनी गौरव वासनवर गंभीर आरोप केला होता. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. गौरव वासनने पैशांची फसवणूक केली, असा आरोप कांता प्रसाद यांनी केला होता.

कांता प्रसाद यांनी माफी मागिलेला व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरही अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.तसेच कांता प्रसाद यांना ट्रोल केले आहे.

एकाने म्हटले की, व्हिडिओग्राफर अडकला आता याची वेळ आहे, तर एका दुसऱ्या युजर्सने म्हटले की काही दिवसांनी म्हणेल मी म्हणलोच नव्हतो व्हिडिओ बनव, त्यानेच जबरदस्ती व्हिडिओ काढाला, अशा अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला मोठे खिंडार; एकाच वेळेस १५ भाजप नेत्यांनी दिला राजीनामा
लिंबाची साल फेकून देऊ नका, कारण लिंबाच्या सालीचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.