घटस्फोट म्हणजे फुकटचे मिळालेले पैसे! शिखर आयेशाच्या घटस्फोटाच्या बातमीने नेटकरी संतापले

इंडियन क्रिकेटर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर खूप रंगू लागल्या आहे. २०१२ मध्ये शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा विवाह झाला होता. आणि आता आयेशाच्या नावाने असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या घटस्फोटाविषयी पोस्ट शेअर केली आहे. यानंतर सोशल मीडियावर लग्नापासून घटस्फोटापर्यंत चर्चा चालू आहे.

शिखर धवनने फेसबुक स्क्रोल करताना क्रिकेटर हरभजन सिंग यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये आयेशा मुखर्जीला पाहीले. धवनने रिक्वेस्ट पाठवली आणि दोघांमध्येही मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर होऊन २००९ मध्ये दोघांनीही लग्न केले शिखर धवन जेव्हा आयेशाला भेटला, तेव्हा तिचा आधीच एक घटस्फोट झाला होता.

तिला पहिल्या लग्नापासून दोनी मुली होत्या आयेशा शिखर धवन पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. लग्नाच्यावेळी शिखर धवनच्या कुटुंबीयांचा या लग्नास विरोध होता. पण नंतर ते या लग्नासाठी मान्य झाले. त्यांनतर शिखर धवनने आयेशाच्या दोन्ही मुलींना दत्तक घेतले. २०१४ मध्ये शिखर आणि आयेशा या दोघांना मुलगा झाला पण आता त्यांच्या घटस्फोटाची गोष्ट समोर आली आहे.

आयेशा मुखर्जी नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली त्यामध्ये घटस्फोटाची बातमी दिली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “मी दोनदा घटस्फोट घेण्यापूर्वी मला घटस्फोट हा वाईट शब्द वाटायचा एक घटस्फोटित असल्याने वैयक्तिक मी तो अनुभवला आहे. जेव्हा पहिल्यादा घटस्फोटित झाले तेव्हा मी खूपच घाबरली होती मला वाटत होत की मी अपयशी ठरले पण त्यावेळी मी चुकीची होती.

सर्वांची मान शरमेनं खाली घातली, मी स्वार्थी होती. असं मला वाटत होत. मी आईवडिलांना निराश करतेय असं वाटत होत.. खूपच वाईट होता तो घटस्फोट” असं त्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिलं होत. शिखर धवनकडून अजूनही अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले गेले नाही आहे. पण आयेशा मुखर्जीच्या ज्या अकाऊंटवरून घटस्फोटाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे ते अकाउंट वेरिफाइड नाही आहे.

जेव्हा ही पोस्ट समोर आली तेव्हा अनेक ट्रोल आणि यूजरच्या कॉमेंट्सचा तिला सामना करावा लागला . एका यूजरने लिहिली होते की, “घटस्फोट म्हणजे आपल्या एक्स नवऱ्याकडून पोटगी मिळवणे. आणि असं पण आयेशा लग्न लग्न व्यतिरिक्त करते काय?”

तर दुसऱ्या यूजरने असे लिहिले की, “आयेशा लिहायला विसरली घटस्फोट म्हणजे फुकटचे मिळालेले पैसे ” तर अजून एका यूजरकडून ” सर्व काही ठीक आहे, “तिला तर शक्तिशाली नारी म्हटले जाईल पण गोष्ट ही आहे कि ती घटस्पोटाच्या नावावर किती पैसे कमवत आहे”. अशा अनेक प्रतिक्रिया यूजरकडून येत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी, कलम १४४ लागू, ७ हजार पोलीसांचा खडा पहारा
अमेरिकेच्या रॅपरला लाईव्ह शोमध्ये एका झटक्यात बसला १७४ कोटींचा फटका; वाचा नक्की काय घडलं
तुरुंगातल्या नेत्याला पक्षात घेतलं म्हणून विरोधकांनी केली टीका; ओवैसींनी भाजपच्या नेत्यांचा क्रिमिनल रेकॉर्डच सांगितला
ब्रेकींग! टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, धोनीसह ‘या’ खेळाडूंची झाली निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.