…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल

९० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री होत्या. ज्यांनी त्यांच्या सुंदरतेने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. खुप कमी वेळात त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश मिळाले होते. त्या टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देत होत्या.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे आयशा झुल्का. आयशाने खुप कमी वेळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये जागा बनवली होती. आयशाचा जन्म मुंबईत झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुर्ण केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

तिने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली होती. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. बॉलीवूडमध्ये डेब्यु केल्यानंतर खुप कमी वेळात तिला यश मिळाले होते. तिने करिअरच्या सुरुवातीला अक्षय कुमार आणि आमिर खानसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

त्यानंतर तिने मिथुन चक्रवर्तीसोबतही काम केले. त्यामुळे ती बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देत होती. असे बोलले जात होते की, आयशा लवकरच बॉलीवूडची अभिनेत्री होईल. पण काही दिवसांमध्येच आयशाचे करिअर फ्लॉप झाले. त्यानंतर ती लग्न करून अभिनयापासून दुर गेली.

एवढ्या वर्षांनंतर आयशाने तिच्या विवाहित आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. लग्नानंतर आयशाने फिल्म इंडस्ट्रीतून मोठा ब्रेक घेतला होता. त्याबद्दल तिला विचारण्यात आले. त्यासोबतच तिला वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

आपल्या विवाहित आयुष्याबद्दल आयशाने सांगितले की, ‘मी खुप लहान वयात अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला तरुणपणी नीट आयुष्य जगता आले नाही. मी नेहमी कामात व्यस्त राहत होते. म्हणून लग्नानंतर मी मोठा ब्रेक घेतला आणि मनसोक्त आयुष्य जगले’.

लग्नानंतर कमातून ब्रेक घेतल्यानंतर तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिला जेव्हा मुलांबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तिने सांगितले की, ‘लग्नानंतर मी आई न होण्याचा निर्णय घेतला. कारण मला माझे जास्त लक्ष सामाजिक कार्यावर देता येईल. माझ्या या निर्णयात कुटुंबाने आणि माझ्या पतीने मला नेहमी साथ दिली’.

पतीबद्दल आयशा म्हणाली की, ‘मी खुप नशीबवान आहे की मला समीरसारखे पती मिळाले. त्यांनी नेहमीच माझ्या निर्णयांचा आदर केला आहे. एक जबाबदार पती म्हणून त्यांनी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. मी त्यांच्यासोबत खुप आनंदी असते’.

आयशाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. म्हणून ती खुप आनंदी आहे. तिला तिच्या करिअरविषयी कोणतीही तक्रार नाही. पण तिने अनेक हिट चित्रपटांना नकार दिला होता. ज्यामुळे ती आजही पश्चात्ताप करते. आयशाने ‘रोजा’ सारख्या हिट चित्रपटाला नकार दिला होता.

चांगल्या चित्रपटांना नकार दिल्यामुळे तिला आजही त्रास होतो. सध्या ती आपल्या आयुष्यात खुप आनंदी आहे. २०१३ मध्ये तिने अभिनयात कमबॅक केला होता. २०१७ मध्ये ती ‘जिनियस’ चित्रपटात महत्त्वाच्या भुमिकेत दिसली होती. ती परत एकदा अभिनयात सक्रिय होत आहे.

महत्वाच्या बातम्या –
गर्लफ्रेंड घरी यायची आणि पत्नीसोबत मिळून माझ्यासाठी जेवण बनवायची; रवी किशनचा गौप्यस्फोट
आशा भोसले यांनी पळून जाऊन केले होते लग्न; वाचा लव्ह स्टोरी
लग्नाच्या १७ वर्षांनंतर आयशा झुल्काने पतीबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाली…
गेल्या महिन्याभरापासून घरी बसून आहेत नट्टूकाका, शुटींगला बोलवण्यात येत नाही; कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.