भयानक दृश्य! साताऱ्यात अल्पवयीन मुलीचे स्मशानभूमीत पूजन; मांत्रिकाने मांडीवर कोंबडा ठेवला अन्…

सातारा| सातारा जिल्हा हा जरी संस्कृती व परंपरेने नटलेला असला तरी या जिल्ह्यात बुवाबाजीच्या अनेक घटना आजही उघडकीस येत आहेत. आपल्या देशात जरी अनेक गोष्टींमध्ये विकास झाला असला तरी अजूनही लोकांची मानसिकता व अंधश्रद्धेला अजूनही बरेचसे लोक बळी पडत आहेत.

अजूनही बरेचसे नागरिक हे बुवाबाजी, तंत्र मंत्र या सर्वच गोष्टींचे शिकार होत आहेत. व अशीच आणखी एक घटना सातारा जिल्हातून पुन्हा समोर आली आहे. सुरूर येथे अल्पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीच्या कट्ट्यावर बसवून तिच्या मांडीवर कोंबडा ठेवण्यात आला होता. मांत्रिकाने पूजन करतानाचा हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी, नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. या व्हिडिओमध्ये स्‍मशानभूमीत पूजेवेळी मुलीच्या मांडीवर कोंबडा देवून तीला कुंकवाने काढलेल्या वर्तुळात बसवल्‍याचे दिसत आहे.

तिच्या समोर बसलेला मांत्रिकाने मुलीसमोर लिंबु, अंडे, नारळ आदी साहित्‍य मांडून बसल्याचे दिसून येते आहे. हा धक्‍कादायक प्रकार वाई तालुक्‍यातील सुरूर गावाच्या स्‍मशानभूमीत घडला आहे. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत.

हे कुटुंब आहे पुण्यातील हडपसर या भागातील राहणार आहे. मुलीला लागलेली लागण ही उतरवायचे आहे म्हणून पुण्यातील मांत्रिकाने या कुटुंबाला घेऊन धावजी पाटील या ठिकाणी काल दाखल झालं. या मांत्रिकानं या कुटुंबाला वाईच्या कृष्णा नदीवर घेऊन या मुलीला आंघोळ घातली.

धावजी पाटील या ठिकाणी आल्यावर त्यानं हिचे कपडे बदलायला लावले आणि या अघोरी प्रकारासाठी बसवलं. व यावेळी पूजा चालू असताना एका युवकान याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. व हा प्रकार समोर आला आहे. ही घटना पहिली नसून याआधीही अशा २ ते ३ घटना घडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
अमृताशी घटस्फोट घेऊन, करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण… सैफ अली खानने केला मोठा खुलासा
अनाथ मुलींनी केला कॅटवॉक; मुलींच्या कॅटवॉक समोर अभिनेत्री देखील पडल्या फिक्या…
नेहा कक्करला प्रेग्नंट बघून सासुलाही बसला धक्का! म्हणाली, एवढ्या लवकर गुड न्युज..
माज किती आहे बघा, मुलासोबतच्या शाहरुख खानच्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.