बाबो! इंटर्नशिपसाठी पठ्ठाने केला ‘असा’ अर्ज; कंपनीने खुश होऊन त्याला दिली लाखो रुपयांची नोकरी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. तर अनेकांना आपल्या पगार कपातीचा झटकाही सहन करावा लागला आहे. तसेच ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांनी नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे.

नोकरी गेल्यामुळे अनेक जण निराश झाले आहे, पण तुमच्याकडे कौशल्य असेल, तर तुम्हाला नोकरी नक्कीच भेटते याचे उत्तम उदाहरण समोर आले. ते उदाहरण म्हणजे मुंबईचा तरुण अवकाश शाह.

अवकाशने एका कंपनीत इंटर्नशिपसाठी अर्ज केला होता, पण त्याने ज्या पद्धतीने तो अर्ज केला ते पाहून कंपनीने त्याला लाखो रुपयांची नोकरीच देऊन टाकली आहे. त्याने अर्ज करताना एका थ्रीडी व्हिडिओ बनवून अर्ज केला होता. त्याची ही कल्पना कंपनीला प्रचंड आवडली आणि त्यांनी अवकाशला नोकरीच बहाल केली आहे.

मुळ मुंबईचा रहिवासी असलेला अवकाश शाह एक थ्रीडी ग्राफीक आणि मोशन डिझाईनर आहे. CRED या अत्यंत प्रसिद्ध कंपनीत त्याची इंटर्नशिप करण्याची इच्छा होती. पण या कंपनीत इंटर्नशिप मिळणे ही खुप कठीण गोष्ट आहे.

त्यामुळे इंटर्नशिप मिळवण्यासाठी अवकाशने एक भन्नाट शक्कल लढवली. त्यामुळे त्याने इंटर्नशिपसाठी सामान्यपणे अर्ज न करता एक थ्रीडी व्हिडिओ बनवून अर्ज केला. त्याने त्याच्या कौशल्याने हा व्हिडिओ बनवला होता. तसेच हा व्हिडिओ बनवून त्याने कंपनीचे संस्थापक कुणाल शाह आणि डिझायनर प्रमुख हरीश शिवरामकृष्णन यांना लिंक्डइनवर टॅग केले.

अवकाशची अर्ज करण्याची कल्पना कुणाल शाह आणि शिवरामकृष्णन यांना इतकी आवडली की त्यांनी त्याला थेट जॉबच दिला आहे. या अर्जावर कुणाल शाह यांनी कमेंट केली आहे. काहीतरी करुन कमवण्यासाठी काहीतरी करुन दाखवावे लागते असे कुणाल शाह यांनी म्हटले आहे. तर CRED डिझाईन माफियाच्या इंटर्नक्लबमध्ये तुमचे स्वागत आहे, अशी कमेंट शिवरामकृष्णन यांनी केली आहे.

मी CRED मध्ये इंटर्नशिप करु इच्छितो. हा माझा अर्ज आहे. मी माझा अर्ज जरा वेगळ्या पद्धतीने करावा असे मला वाटते, असे म्हणत अवकाशने हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत ६६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे, तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट केल्या आहे.

https://www.linkedin.com/posts/avkashshah_i-want-to-intern-at-cred-heres-my-application-activity-6806143033738878976-cvHS

महत्वाच्या बातम्या-

त्याने मित्रांसमोर माझी….; करीश्मा कपुरने घटस्फोटानंतर केला होता धक्कादायक खुलासा
..आणि बच्चू कडू वेशांतर करून पोहोचले शासकीय कार्यालयात, पुढे काय झाले वाचा..
नागपूर हादरले! पत्नी, मुलगा, मुलगी, सासूसह मेहुणीची हत्या करत पतीने स्वतःला संपवले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.