मराठी सिनेसृष्टीतील गाजलेली लव्ह स्टोरी अविनाश आणि ऐश्वर्या नारकर

अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीत आणि नाटकातील मोठे नाव आहे. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अविनाश नारकर यांचे नाव घेतल्यावर अजून एक नाव सर्वांना आठवते. ते नाव आहे ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर यांच्या पत्नी.

अविनाश आणि ऐश्वर्या यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला नेहमीच लोकांनी पसंत केले आहे.

मालिकांसोबतच या दोघांची जोडी खऱ्या आयुष्यात देखील तेवढीच हिट आहे. या दोघांची लव्ह स्टोरी ही मराठी सिनेसृष्टीत एक सर्वात हटके लव्ह स्टोरी आहे.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या हे दोघेही अनेक नाटकांमध्ये काम करत होते. पण या दोघांचे ‘गंध निशिगंधाचा’ हे पहिले एकत्र नाटक होते.

याच नाटकावेळी या दोघांची ओळख झाली. इथून पुढे या दोघांचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला.

या काळात अविनाश नारकर यांची दूरदर्शनवर ‘बे दुणे चार’ ही मालिका सुरू होती. या मालिकेसोबतच ते नाटक देखील करत होते.

ऐश्वर्या यांचे माहेरचे नाव पल्लवी आठवले होते. पल्लवीला पाहताच क्षणी अविनाश तिच्या प्रेमात पडले. पल्लवी नाटकासोबत शिक्षण देखील पूर्ण करत होत्या.

अविनाश हे पल्लवीपेक्षा मोठे होते. त्यांनी अनेक नाटके केली होती. त्यामूळे पल्लवी अविनाशसोबत जास्त बोलत नव्हती. पण सेटवर सर्वांशी ती जास्त बोलत होती. फक्त अविनाशशी बोलत नव्हती.

त्यामूळे अविनाश यांना ती अशी का वागते? असा प्रश्न पडला. त्यांच्या नाटकाचे अनेक ठिकाणी दौरे होते. त्यामुळे त्यांचा हा प्रवास एकत्र बसने होत असत.

या प्रवासात अविनाश आणि पल्लवी वेगवेगळे बसायचे. पण अविनाशचे सगळे लक्ष पल्लवीकडे असायचे. या काळात पल्लवी देखील अविनाशला पसंत करू लागली होती.

पण हे दोघे जास्त बोलत नव्हते. त्यामूळे या दोघांना एकमेकांच्या भावनांबद्दल कल्पना नव्हती. या नाटकाच्या शेवटच्या दौऱ्याच्या वेळेस या दोघांनी आपआपल्या भावनांची कबूली दिली.

पण आत्ता या दोघांसोमर घरी कस सांगायचं हा प्रश्न होता. गणपतीमध्ये अविनाश नेहमी पल्लवीच्या घरी जायचा. एकदा पल्लवीच्या बाबांनी अविनाशला गणपतीकडे काय मागितलस? असा प्रश्न केला

यावर अविनाशने मी पल्लविला मगितले असे उत्तर दिले. यावरून त्यांना समजले की हे दोघे एकमेकांना पसंत करतात. घरच्यांनी यांच्या लग्नाला परवानगी दिली.

लग्नानंतर पल्लवीचे नाव ऐश्वर्या नारकर झाले. लग्नानंतर देखील या दोघांनी अभिनय क्षेत्रात काम करणे सुरू ठेवले. सुन लाडकी सासरची या मालिकेतुन ऐश्वर्याने चित्रपटांमधील प्रवास सुरु केला.

या दोघांनी महाश्वेता, लेक माझी लाडकी, या सुखानो या, माझे मन तुझे झाले अशा मालिकांमध्ये एकत्र काम केले. या दोघांचा संसार गेले कित्येक वर्षे सुखाने सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.