पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने(Auto Driver) मंगळवार पेठेत धमकावून दोन विद्यार्थ्यांना लुटले आहे. याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोकर ( वय- १८ ) या विद्यार्थ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.(auto driver robbed two students)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हा विद्यार्थी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वाढदिवसानिमित्त अनुपच्या वडिलांनी त्याला शेगावहून भेटवस्तू पाठवल्या होत्या. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून ही भेटवस्तूचे खोके पाठवण्यात आले होते. ही बस संगमवाडी बस स्थानकावर येणार होती. त्यामुळे अनुप व त्याचा मित्र सार्थक ती भेटवस्तू आणण्यासाठी रविवारी पहाटे त्या ठिकाणी गेले.
अनुप व सार्थक यांनी त्या भेटवस्तूचे खोके बसमधून घेतले. त्यानंतर रिक्षातून ते मॉडेल कॉलनीत जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी रिक्षाचालकाने काही अंतरावर गेल्यावर त्याचे साथीदार रिक्षात घेतले. त्यानंतर रिक्षाचालक त्या विद्यार्थ्यांना मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली घेऊन गेले. रिक्षाचालकाने पुलाखालील अंधारात रिक्षा थांबविली.
त्यानंतर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी त्या मुलांना चाकूचा धाक दाखवला आणि धमकावले. यानंतर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी अनुप जवळील दोन मोबाइल घेतले. तसेच सार्थकच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड देखील लुटली. यानंतर रिक्षाचालकाने धमकावून फोन पे वरून दोन हजार रुपये पाठवण्यास सांगितले.
विद्यार्थ्यांची लूट केल्यानंतर रिक्षाचालक आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणाहून पसार झाले. त्यानंतर अनुप व सार्थक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित शेटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या एका व्यापाऱ्याला देखील नाशिकमधील रिक्षाचालकाने लुटले होते. एक व्यापारी मध्यरात्री रिक्षाने प्रवास करत होता. त्यावेळी वेळ साधत रिक्षाचालकाने त्या व्यापाऱ्याला धमकावले आणि रोकड लुटली. यानंतर त्या व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले होते.
महत्वाच्या बातम्या :-
Russia Ukraine war: मोदींचा तो फोटो पुन्हा होतोय व्हायरल, पुतिन यांच्यामागे हात बांधून उभे आहेत मोदी
‘माझे शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत’, राऊतांच्या दाव्याने उडाली खळबळ
मला जे सांगायचे होते ते मी.., झुंडच्या वादावर नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण