महाराष्ट्रात ऑटोरिक्षा लवकरच सम विषम पद्धतीने चालणार

 

मुंबई | महाराष्ट्र सरकार ऑटोरिक्षाना सम विषम पद्धतीवर चालवण्याची योजना बनवत आहे. रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे.

या योजनेनुसार, ज्या रिक्षाचा अंतिम रजिस्ट्रेशन नंबर सम आहे त्या रिक्षा विषम तारखेला चालवल्या जातील. विषम रजिस्ट्रेशन नंबर असणाऱ्या रिक्षा सम तारखेला चालवण्यात येतील.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी सल्ला देणाऱ्या मंडळाशी पुढच्या आठवड्यात भेट घेऊन चर्चा केल्यावर या पर्यायाचा विचार केला जाणार असल्याचे सांगितले.

सरकारच्या सुरू असणाऱ्या या विचारावर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी टीका केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.