फक्त १२ रनांचा टार्गेट पुर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खेळल्या होत्या १६ ओव्हर; वाचा त्या ऐतिहासिक मॅचबद्दल

क्रिकेटविश्वात अशा अनेक मॅचेस असतात, ज्या क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत असतात. काही गोष्टी शक्य नसतात तरी त्या गोष्टी अनेपक्षितपणे मैदानात घडतात. असाच एक सामना क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झाला होता.

या ऐतिहासित सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे सामन्याचे चारही डाव एकाच दिवसात खेळले गेले होते. चारही डावात दोन्ही संघाना फक्त १०५ धावा करता आल्या होत्या.

त्यामध्ये १६ फलंदाज तर शुन्यावरच आऊट झाले होते. २७ मे १८७८ ला झालेला हा सामना क्रिकेटप्रेमी आजही विसरु शकलेले नाही. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मर्लिबॉन असा होता. मेरीलबोन संघाचा दुसरा डाव फक्त १९ धावांवर संपला होता.

या सामन्यात मर्लिबॉन क्रिकेट क्लबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय मात्र चुकला होता. पहिल्या डावात मर्लिबॉनला केवळ ३३ धावा करता आल्या. फक्त एकाच फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या होत्या. तो म्हणजे सलामीवीर माकी हॉर्नबी, त्याने सर्वाधिक म्हणजेच १९ धावा केल्या होत्या.

या डावात सहा खेळाडू शुन्यावर वाद झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या फ्रेडरिक स्पॉर्थ या वेगवान गोलंदाजाने ५.३ षटकात ४ धावा देऊन ६ बळी घेतले होते. तर हॅरी बोएलने उरलेले तीन बळी घेतले होते. पण ऑस्ट्रेलिया जेव्हा फलंदाजीला उतरली तेव्हा तिची अवस्थाही मर्लिबॉनपेक्षा काही वेगळी नव्हती.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त ४१ धावांवरच संपला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिली मिडविन्टरने सर्वाधिक म्हणजेच १० धावा केल्या होत्या. त्यामध्ये तीन खेळाडू तर शुन्यावरच आऊट झाले होते.

दुसरा डाव खुप महत्वाचा होता. पण दुसऱ्या डावात पण मर्लिबॉनला चांगल्या धावा करणे शक्य झाले नाही. हा संघ फक्त १९ धावांवर आऊट झाला. यामध्ये जवळपास सात खेळाडू खातं न उघडताच तंबुत गेले. विल्फ फ्लॉवर्सने सर्वाधिक म्हणजे ११ धावा केल्या होत्या.

त्यावेळी ऑस्ट्रेलियाला फक्त १२ धावा करायच्या होत्या पण त्या धावा करण्यासाठीही ऑस्ट्रेलियाला खुप त्रास झाला होता. १२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १६ षटकात पुर्ण केले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया ९ विकेटने हा सामना जिंकला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.