क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणी कामगिरी

ढाका । क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. एकेकाळी बलाढ्य मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आता काहीसा मागे पडला आहे. आता बांगलादेशच्या दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला आहे. पहिल्या टी-20 मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा २३ रनने पराभव केला आहे.

यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यासारखा बलाढ्य राहिला नसल्याचे दिसून येत आहे. बांगलादेश गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या संघांना धक्का देत आहे. त्यांच्याकडे आता अनेक आक्रमक खेळाडू आहेत. यामुळे ते मोठ्या टीमला देखील टक्कर देत आहेत.

बांगलादेशच्या १३१ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १०८ रनवर ऑल आऊट झाला. या सामन्यात बांगलादेशकडून नसूम अहमदने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. मुस्तफिजूर रहमान आणि शोरीफूल इस्लाम यांना प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४५ रन केले, तर मिचेल स्टार्कला १४ आणि मॅथ्यू वेडला १३ रनची खेळी करता आली. यामुळे त्यांना विजय मिळवता आला नाही. यामुळे त्यांना धक्का बसला आहे. या विजयासोबतच बांगलादेशने टी-20 सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे.

दोन्ही टीममध्ये ५ टी-20 मॅचची सीरिज खेळवली जात आहे. दुसरी टी-20 बुधवारी होणार आहे. यामुळे आता पुढच्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी वर्ल्ड कपसाठी ही एक रंगीत तालीम बघितली जात आहे.

ताज्या बातम्या

…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक, पाहा व्हिडिओ

सियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.