माझ्या पार्थिवाला माझ्या पत्नीने अग्नी द्यावा आणि…; शेवटची इच्छा व्यक्त करत तरुणाने घेतली फाशी

देशभरात गेल्यावर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीकर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या जाऊन ते बरोजगार झाले होते.

तसेच काही लोक अर्थचक्र बिघडल्यावे काही लोकांनी मानसिक तणावात आत्महत्या केली आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. एका तरुणाने डोक्यावर कर्ज असल्यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती, ती चिठ्ठी होती. त्यामध्ये माझ्या पार्थिवाला माझ्या पत्नीने अग्नी द्यावी असे म्हटले होते. हीच त्याची शेवटची इच्छा असल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. सध्या पोलिसांना तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढचा तपास सुरु आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भीमराव कांबळे असे असून त्याचे वय ३० वर्षे होते. तो तरुण औरंगाबादच्या वेदांतनंगरमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. व्यवसायाने तो एक वाहनचालक होता.

लॉकडाऊन होण्यापुर्वी त्याने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली होती. रिक्षा घेतल्यानंतर काही दिवसातच कोरोनाची साथ आली. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वकाही बंद झालं. उदरनिर्वाह करणे कठिण झाले होते. तसेच कर्जाचे हफ्ते भरणेही कठिण झाले होते.

त्यामुले भीमराववरील तणाव वाढत चालला होता. गुरुवारी पत्नीशी बोलतानाही तो तणावातच होता. तासाभरात येतो, असे सांगुन तो साडे दहाच्या सुमारास घराबाहेर पडला होता. खुपवेळ झाला तरी भीमराव न आल्याने भीमरावाच्या पत्नीने शोधाशोध सुरु केली. तसेच याबाबत नातेवाईकांना सांगितले.

शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास राजनगरमधील एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत भीमरावचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक सुरेंद्र माळाळे यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताला तातडीने दवाखाण्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डोक्यावरील कर्जाच्या ओझामुळे आत्महत्या करत आहे. तसेच आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु, असे भीमरावने आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

काॅंग्रेस एनसीपीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपच्या प्रदीप गावडेला अटक
…म्हणून शाहरुख खानच्या मुलीला डेट करण्याचे धाडस कोणी करत नाही; शाहरुख खानने सांगितले डेटचे सात रुल
ह्या बाळाचा डान्स पाहून भले भले तोंडात बोट घालतील; गाणंही किती गोड गातय..; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.