लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलेच्या परिस्थितीची कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले, म्हणली…

औरंगाबाद | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. अशात हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर भुकेने तडफडून मरण्याची वेळ आली आहे. याच चित्र स्पष्ट करणारी घटना औरंगाबाद येथून समोर आली आहे. असंघटीत क्षेत्रातील नागरिकांचे या लॉकडाऊनमुळे होणारे हाल पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.

कोरोनाच्या भीतीने घरात बसलो तर भुकेनं मरू अशी अवस्था अनेकांची झाली आहे. असे लोक आता घरातून बाहेर पडू लागले आहेत. औरंगाबाद मधील एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरात अन्नाचा एक कणही उरला नाही. त्यामुळे आपल्या तीन मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला आहे.

या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तेव्हापासून ही महिला घरकाम करून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करत आहे. दरम्यानच्या काळात कोरोना महामारीने हाहाकर माजवला आणि लॉकडाऊन पडले. त्यामुळे या महिलेचे घरकाम सुटले आणि नव्याने दुसरे काम मिळणे कठीण झाले.

जवळ पैसे नाहीत आणि हाताला काम नाही यामुळे या महिलेचे कुटुंब संकटात सापडले. तिला किराणा भाजीपाला आणण्यासाठी पैसे उरले नाहीत. त्यामुळे उपाशीपोटी झोपण्याची वेळ मुलांवर आली. अखेर तिने घराबाहेर पडत कामासाठी थेट पोलिसांची मदत मागितली.

साहेब मला मदत नकोय, फक्त काम द्या, माझ्या घरात अन्नाचा कणही उरला नाही. अशा शब्दांत महिलेनं मदत मागितल्यानंतर पोलिसांचे डोळेही पाणावले. घरकाम करून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या या महिलेची काहाणी ऐकून पोलिसांनी तिची मदत केली आहे.

पोलिसांनी वर्गणी काढून संबंधित महिलेला ४५ किलो किराणा घेऊन दिला. तसेच काम मिळवून देण्याची हामी पोलिसांनी दिली. याशिवाय या महिलेला रिक्षा करून तिच्या घरी सोडण्याची व्यवस्था पोलिसांनी केली.

महत्वाच्या बातम्या-
बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाचे डोळे फिरले; बहिणीचे १२ लाखाचे दागिने आणि पैसे हडपले
गंगेत वाहणारे मृतदेह भारताचे नाहीत तर नायजेरियाचे; पंगा क्विन कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य
म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.