म्यानमारची २६ वर्षांची हुकूमशाही मोडून काढली होती ‘या’ मुलीने; भारतातच झाले होते तिचे शिक्षण

 

म्यानमार आधी अखंड भारताचा भाग होता. ज्याप्रमाणे इंग्रजांनी भारतावर राज्य केले होते, त्याचप्रमाणे म्यानमारवरही राज्य करण्यात आले होते. जेव्हा इंग्रज सोडून गेले तेव्हा चांगला काळ येणारच होता. पण लवकरच तिथे सैन्याने ताबा मिळवला.

सैन्यांनी तब्बल २६ वर्षे म्यानमारवर निर्विवाद राज्य केले होते, त्यानंतर भारतात शिकलेली एक महिला पुढे आली आणि तिने म्यानमारच्या जनतेची सैनिकांच्या सत्तेपासून सुटका मिळवून दिली होती.

त्यासाठी तिला दोन दशके जेलमध्ये राहिल्यानंतर तिने देशात संविधान लागू केले होते, मात्र आता पुन्हा एकदा तिथल्या सैन्यप्रमुखाने सत्तापालट केली आहे, आता सत्ता पुन्हा सैन्याच्या हाती गेला असून सगळी सुत्र आता लष्करप्रमुखाकडे गेली आहे.

सोमवारी सकाळी जेव्हा लोक झोपेतून उठले, तेव्हा त्यांना कळाले की पुन्हा सैन्याचे राज्य आले आहे. हि बातमी टिव्हीवर दिसण्यास सुरुवात झाली, त्यानंतर काही वेळातच ते चॅनेलचे सिग्नल गेले. घराबाहेर सैनिकांच्या तुकड्या तैनात झाल्या, पण हे नेसकं घडलं कसं? काय आहे म्यानमारचा इतिहास? चला तर मग जाणून घेऊया…

जेव्हा दुसरे महायुद्ध झाले त्यानंतर म्यानमारचा ताबा इंग्रजांकडून जपानकडे गेला. तेव्हा म्यानमारवर सैन्यशासन सुरु झाले. या शासनामध्ये अत्याचारांची सीमाच नाही राहिली. त्यामुळे तिथल्या नागरिकांना सैन्यशासन नको होते.

त्यासाठी एक नेता पुढे आला त्याचे नाव होते आंग सांग. त्यांनी एँटी फासिस्ट पिपल्स फ्रिडम या पक्षाची स्थापना केली होती, सांग यांनी इंग्रजांच्या मदतीने सैन्यशासन संपवले.

इंग्रजांनी सत्ता सोडल्यानंतर लोकांना सगळ्यांना वाटले होते, की सांग पंतप्रधान होतील, पण विरोधी गटाने त्यांची हत्या केली आणि पंतप्रधान म्हणून यु नु पंतप्रधान झाले. यु नु सांग यांच्याच पक्षात होते, पण १९५८ साली त्यांच्यात फुट पडली होती.

त्यानंतर यु नु हे आर्मी स्टाफ ने विन यांच्याशी त्यांनी भेट घेतली. तसेच त्यांना केअर टेकर पंतप्रधान बनण्याची विनंती केली आणि तिथूनच खरंतर सैन्याचे शासन सुरु झाले.

१९६० मध्ये म्यानमारमध्ये निवडणूका झाल्या पण ने विन यांना पंतप्रधानपद सोडायची इच्छा झाली, त्यामुळे त्यांनी विद्रोह केला आणि १९६२ पासून म्यानमारमध्ये सैन्यशासनाला सुरुवात झाली.
सैन्यशासन आल्यामुळे अनेक गोष्टींना म्यानमाकमध्ये बंदी घालण्यात आली. त्यात सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली होती. तसेच देशाचे संविधानही सैन्यांनी भंग केले होते. मुक्तपत्रकारितेवर बंदी घालण्यासोबतच म्यानमारचा जगाशी असलेला संबंध तोडून टाकण्यात आला होता.

ने विन यांनी तब्बल २६ वर्षे म्यानमारवर राज्य केले. मात्र विन यांची एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली, ती म्हणजे नोटबंदी. त्यांनी म्यानमारमध्ये नोटबंदी लागू केली त्यामुळे देशात आर्थिक मंदी आली. अनेकांचे रोजगार गेले.

त्यामुळे १९८८ मध्ये देशात आंदोलन सुरु झाले, या आंदोलनात सैन्याकडून खुप हिंसा झाली, त्यानंतर ८ ऑगस्ट १९८८ ला तर सैन्याने ३ हजार नागरिकांचा बळी घेतला.

त्यावेळी दिल्ली विद्यापीठात शिकलेली एक मुलगी पालकांना भेटण्यासाठी म्यानमार गेली. तिथे स्वातंत्र्याला गेलेला तडा पाहून तिच्या मनात देशाला स्वांतत्र्य मिळवून देण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिथुनच एका नव्या लढ्याला सुरुवात झाली. त्या मुलीची नाव होते आंग सान सु की ही आंग सान यांची सर्वात लहान मुलगी होती.

आंग सान सु कीने एक राजकीय पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी असे ठेवले. १९९० मध्ये म्यानमारमध्ये निवडणूका झाल्या आणि या निवडणुकीत देशाच्या ८५ टक्के मत सू यांना मिळाली. पण हे कळताच सू यांना नजरकैदेत टाकले.

त्या तब्बल २० वर्षे नजरकैदेत होत्या, त्या काळात त्यांना शांतीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, पण त्यांनी तो नाही स्विकारला. २०१० मध्ये त्या नजरकैदेतून बाहेर आल्या. २०१२ मध्ये त्यांनी नोबल पुरस्कार स्विकारला.

२०१५ च्या निवडणूकीत त्यांच्या पक्षाला ८६ टक्के मते मिळाली, पण त्यांचे पती परदेशी नागरिक असल्याने त्यांना पंतप्रधान होता आले नाही कारण त्यावेळी सैन्याने नियम केला होता की, पती किंवा पत्नी जर दुसऱ्या देशाचे नागरिक असेल तर पंतप्रधान बनता येणार नाही.

आता लष्करप्रमुख मिन आंग लाईंग यांनी निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला असून आता त्यांनी म्यानमारची सत्ता ताब्यात घेतली आहे. आता त्यामुळे आता म्यानमारमध्ये आता एक वर्षाची आणीबाणी लागू झाली आहे. तर असा होता म्यानमारचा इतिहास.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.