राम मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी ५ ऑगस्टची वेळ ‘अशुभ’- शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राम मंदिराचे काम सुरू करण्यात येणार आहे. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

आता राम मंदिराच्या भूमिपूजनावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी ही वेळ राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अशुभ असल्याचे म्हटले आहे.

आम्हाला कोणतेही पद नको किंवा राम मंदिराचे विश्वस्थही व्हायचे नाही. आमची इतकीच इच्छा आहे की, मंदिराचे काम व्यवस्थित व्हायला हवे.

तसेच योग्य वेळी पायाभरणी करायला हवी, मात्र आताची वेळ ही अशुभ आहे, असे मत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी मांडले आहे.

तसेच प्रभू रामचंद्राचे मंदिर जनतेच्या पैशातून उभारले जाणार आहे. तर मंदिर बांधकामासंदर्भात लोकांचीही मते जाणून घ्यायला हवी, असेही शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.