Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा रविवारी पहाटे अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या गाडीला ट्रकने धडक देऊन त्यांचा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले असताना आता या प्रकरणाला एक नवे वळण आले आहे.
हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा विनायक मेटेंचे समर्थक आणि कुटुंबियांकडून केला जात आहे. यातच आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विनायक मेटेंच्या जवळचे असलेले अण्णासाहेब मायकर यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचे सांगण्यात येत आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये ३ ऑगस्ट रोजीसुद्धा विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाला असल्याचे सांगितले जात आहे. ३ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता शिक्रापूरजवळ एक गाडी आमचा पाठलाग करत होती. आमच्या गाडीच्या पुढे एक आयशर ट्रक चालत होता आणि मागून एक चारचाकी गाडी होती. त्यात तीन-चार लोक बसले होते.
त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. परंतु, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिलात. ती गाडी आमच्या मागेपुढे करत होती. तर आयशर ट्रक पुढेही जात नव्हता आणि आम्हालाही जाऊ देत नव्हता. तसेच आमच्या गाडीला सतत दाबण्याचा प्रयत्न केला जात होता.
आमच्या पुढे आयशर ट्रक आणि मागे चारचाकी असे जवळपास दोन-अडीच किलोमीटरपर्यंत सुरू होते. त्यानंतर पुढे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेली. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी या ऑडिओमध्ये दिली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर आता विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
politics: घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
Veer Savarkar: सावरकरांचा फ्लेक्स हटवून टिपू सुलतानचा लावण्याचा प्रयत्न, विरोध करताच घडला भयानक प्रकार
Milk : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका; अमुल, मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवल्या
Saif Ali Khan: ५००० कोटींच्या संपत्तीतील एक कवडीही मुलांना देणार नाही सैफ अली खान, ‘हे’ आहे कारण