Share

प्रसिद्ध मराठी मालिकांमधील ‘त्या’ दृश्यांवर प्रेक्षक संतापले, म्हणाले, ‘लहान मुलांना तरी सोडा रे’

मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढावा यासाठी अनेक वेळा कथेमध्ये बदल करण्यात येतात. सध्या सर्व मालिकांमध्ये नेहमीच मुख्य नायक किंवा नायिका यांच्याविरोधात काही व्यक्ती कटकारस्थान रचत असल्याचे दाखवले जाते. मालिकेमध्ये(Serial) रंजकता आणण्यासाठी अशा घटनांची रचना केली जाते. पण आता यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश करण्यात आला आहे.(Audiences get angry over ‘those’ scenes in famous Marathi serial)

अनेक मालिकांमध्ये लहान मुलांना एकमेकांविरोधात कटकारस्थान करताना दाखवण्यात आले आहे. यावरून प्रेक्षक मालिकांच्या निर्मात्यांवर चांगलेच भडकले आहेत. ‘लहान मुलांना तरी सोडा’ अशी भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत. नुकतंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये सिम्मी परीला दिल्या जाणाऱ्या इंजक्शनमध्ये पाणी भरताना दाखवण्यात आली आहे.

तसेच दुसरीकडे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत स्वराची आई आजारी असल्याचे दाखवण्यात आले होते. आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे स्वराकडे पैसे नसतात. त्यावेळी गावकरी स्वराला आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे कमावण्याचा सल्ला देतात. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत लहान मुलीसोबत एक व्यक्ती गैरवर्तन करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

याशिवाय ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये श्वेता दीपिका आणि कार्तिकीला खूप त्रास देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. मालिकांमध्ये रंजकता वाढविण्यासाठी लहान मुलांना अशा काटकारस्थानांमध्ये का ओढलं जात आहे? असा सवाल प्रेक्षकांनी मालिकांच्या निर्मात्यांना केला आहे.

मालिकांमधील अश्या दृश्यांचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होत आहे, असा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. या सर्व प्रकरणावर मालिकेचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांनी मत व्यक्त केलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर म्हणाले की, “चित्रीकरण करत असताना आम्ही परी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मायाराची नीट काळजी घेतो. चित्रित करण्यात येणारे सर्व प्रसंग खोटे आहेत, हे तिला सतत सांगितले जाते.”

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचे लेखक चैतन सैंदाणे म्हणाले की, “अनेकवेळा कथेसाठी विशिष्ट पद्धतीचं लिखाण गरजेचं असतं. तसेच लहान मुलांशी संबंध असणारे काही प्रसंग अनेकदा वगळण्यात येतात. प्रेक्षकांवर चुकीचा परिणाम होणार नाही. याची काळजी घेतली जाते. यासाठी मालिकेची एक टीम काम करत असते”, असे लेखक चैतन सैंदाणे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काँग्रेसने विंनती केल्यानंतर मतांचा कोटा बदलला
फक्त पाच दिवस सोनं स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णयोग, सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री झाली सुरू
यावेळी तुम्हाला मला मतदान करावंच लागेल नाहीतर…, खडसेंचे भाजप आमदारांना साकडे

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now