अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

अगदी अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस आलेली ‘देवमाणूस’ मालिका मोठी चर्चेत आली. आता मात्र ही मालिका लवकरच संपणार आहे. मालिकेत नवीन पात्रांची एन्ट्री झाल्यामुळे प्रेक्षक गोंधळले होते. आता मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे आता चाहते नाराज झाले आहेत.

१४ किंवा १५ ऑगस्ट रोजी देवमाणूस मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामुळे शेवटच्या भागाची देखील तारीख निश्चित झाली आहे. यामुळे आता प्रेक्षकांना नवीन मालिकेची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता ‘ती परत आलीये’ मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर ते टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. यामुळे प्रेक्षक त्यांची वाट बघत आहेत.

हत्या घडत असल्याने परिसरात विजय कदम गस्त घालताना दिसत आहेत. अशा स्वरूपाचा आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेबाबत देखील चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून देव माणूस ही मालिका लवकरच निरोप घेणार याबाबत चर्चा सुरू होती. यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता नवीन मालिका प्रेक्षकांना आवडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

संजय राऊतांना शिवसेना भवनच्या आत नेऊन फटके देणार; राणेंच्या धमकीने राजकारणात खळबळ

चक दे इंडिया! ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पहा निर्णायक गोल

अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबेडीत; लग्नाची झाली पूर्ण तयारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.