औरंगाबादमध्ये डिझेलचा टँकर पलटी; डिझेलसाठी शेकडो लोकांची धावपळ, तर एका पठ्ठ्याने आणला २०० लीटरचा ड्रम

औरंगाबादच्या वैजापुर तालूक्यातील करंजगावाजवळ एक मोठा डिझेलचा टँकर पलटी झाला आहे. ही बातमी खुप पसरल्याने डिझेल घेऊन जाण्यासाठी टँकरच्या ठिकाणी तुंबाड गर्दी केली आहे.

कोणी बकेट, कोणी पाच लीटरचा कॅन, कोणी २०० लीटरचा ड्रम तर कोणी हाताला लागेल ते घेऊन लोकं घटनास्थळी पोहचले आहे. सर्व नागरीक जमेल तेवढे डिझेल गोळ्या करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या धावपळीचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा टँकर सकाळी साडेसात वाजता मुंबई-नागपुर हायवेवरुन जालना जिल्ह्याकडे जात होता. तेव्हा औरंगाबादच्या वैजापुर तालुक्यातील करंजगावाजवळ हा टँकर रस्त्याच्या खाली गेला आणि पलटी झाला.

त्यानंतर डिझेलचा टँकर पलटी झाल्याची बातमी क्षणात गावभर पसरली. त्यामुळे सर्वच गावकऱ्यांनी डिझेल घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. या ठिकाणी डिझेल घेऊन जाण्यासाठी बाया-माणसं, वृद्ध, लहान मुलं सर्वच लोकं हातात जे मिळेत ते घेऊन डिझेल भरताना दिसून आले.

या काटेरी झाडांमध्ये तब्बल १००-२०० माणसं डिझेल जमा करताना दिसून आली. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याचा टँकर आल्यावर नागरीकांची जशी धावपळ होते, तशीच धावपळ या ठिकाणी दिसून आली आहे.

त्यामध्ये एका पठ्ठ्याने तर चक्क २०० लीटरचा ड्रमच घेऊन आला होता आणि त्यामध्ये तो जेवढं शक्य होईल तेवढं डिझेल भरण्याचा तो प्रयत्न करत होता. ९४ रुपये प्रति लीटर पेट्रोल असल्यानेच गावकऱ्यांनी कोणाही विचार न करता काट्यात जाण्याचे धाडस केल्याचे दिसून आले.

दरम्यान, या घटनेत टँकरचा क्लिनर जखमी झाला आहे, तर ड्राव्हरलाही थोडासा मार लागलेला आहे. पण डिझेलसाठी धावपळ करत आलेल्या लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. थोड्याचवेळात घटनास्थळी पोलिस पोहचल्याने हा सर्वप्रकार थांबवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आर्याला असं अडकवणार डॉक्टर स्वतःच्या जाळ्यात; देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट
काय सांगता! विवाहित असलेला पुरुष गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, आणि….
धक्कादायक! मुल होत नसल्याने नवऱ्याने पत्नीला सोपावलं मांत्रिकाकडे अन् मांत्रिकाने जे केलं ते ऐकून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.