Ekanth Shinde : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर बुधवारी पार पडला. हा दसरा मेळावा आता चांगलाच चर्चेत आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून तर एकनाथ शिंदेंनी बीकेसी मैदानातून आपले शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी अनेक मुद्द्यांवरून ठाकरेंना खडे बोल सुनावले. त्यामुळे त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण चांगलेच गाजले आहे. मात्र, आता त्यांच्या या भाषणावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत.
BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा लोटांगण सोहळा सुरु आहे.
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) October 5, 2022
यातच काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टीका केली आहे. BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा लोटांगण सोहळा सुरु आहे, असे ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
BKC तील दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSS चे प्रवक्ते बनून RSS ने देश कसा घडवला याचे ज्ञान वाटत आहेत.
ED च्या भीतीपायी तुम्ही गद्दारी केली त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही पण काहीही बोलून मुख्यमंत्रीपदाची गरिमा घालवू नका.
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) October 5, 2022
तसेच BKC तील दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSS चे प्रवक्ते बनून RSS ने देश कसा घडवला याचे ज्ञान वाटत आहेत. ED च्या भीतीपायी तुम्ही गद्दारी केली त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही पण काहीही बोलून मुख्यमंत्रीपदाची गरिमा घालवू नका, असेही अतुल लोंढे म्हणाले आहेत.
BKC मध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा चांगले आहे.
त्या तुलनेत मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे!पैसा खर्चून गर्दी आणली, भाषणही लिहून आणले पण वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही हेच BKC मध्ये दिसले.
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) October 5, 2022
पुढे ते म्हणाले की, BKC मध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे. इव्हेन्ट मॅनेजमेंटसुद्धा चांगले आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्र्यांचे भाषण फारच सुमार दर्जाचे! पैसा खर्चून गर्दी आणली, भाषणही लिहून आणले पण वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही हेच BKC मध्ये दिसते, असे ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही एकनाथ शिंदेंच्या भाषणावर टीका केली आहे. काही भाषणं फारच नको इतकी लांबली, असे ते म्हणाले आहेत. सध्या एकनाथ शिंदेंचे भाषण हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
महत्वाच्या बातम्या
Dasara melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फजिती; सभा सुरू असतानाच लोकांनी घेतला काढता पाय, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंची सून; एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चा
Eknath shinde : एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जागतिक विक्रम?काय घडलं विशेष, वाचा
eknath shinde : एकनाथ शिंदेची खेळी! मेळाव्यासाठी भाजप-मनसे नेत्यांना निमंत्रण नाही, वाचा नेमकं काय प्रकरण?