“घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा सोहळा पार पडला कसा”

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ असताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखत आहे, त्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यावर जोरदार टोलेबाजीही सुरु आहे.

अशात बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. आता या सोहळ्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाण साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भूमिपूजनाचा सोहळा पार कसा पडला? असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना वाढत आहे. नियमांचे पालन करणे, गरजेचे आहे, असे म्हटले होते. त्या वक्तव्याला धरून आता भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाण साधला आहे.

मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांना पण कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते विलगिकरणात होते, पण खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.