Share

Sharad Pawar : पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर शरद पवारच; गंभीर आरोप करत चौकशीची मागणी

sharad pawar

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जेलमध्ये आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आता या पत्राचाळ घोटाळ्यासंबंधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी उमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अतुल भातखळकर यांनी या पत्रात लिहिले की, मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते.

त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र लिहिले आहे. या पत्रावरून हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत देवेंद्र फडणवीसांकडे शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Kohinoor diamond: कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा! हिरा इंग्लंडकडून परत आणा, राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी
coins : १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॅंकेला युवकाने शिकवला चांगलाच धडा; वाचा नेमकं काय घडलं..
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका ; १० लाखांचा दंडही ठोठावला, वाचा काय आहे नेमकं प्रकरण 
BJP : जळगावात भाजपाच्या चारी मुंड्या चीत, गिरीश महाजनांना भोपळा, कुणी मारली बाजी?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now