‘मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’… फुकटच्या टीमक्या’ 

मुंबई | रविवारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केले. याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटके न फोडण्याचे, तसेच काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता, असे ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना म्हंटले होते.

याचाच धागा पकडत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणं म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखं आहे,’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’… फुकटच्या टीमक्या..’ असे म्हणत त्यांनी लक्ष केले आहे.

भातखळकर यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पुढे ते म्हणतात, ‘कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणं म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखं आहे. त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्रद्वेष्टे कोण आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

याचबरोबर महाराष्ट्रद्वेष्टे कोण आहेत? याची नावं घेतली असती, तर थोडं अधिक बरं झाले असते. परंतु कायद्याचा गैरवापर करून लोकांना आपण तुरूंगात टाकतो आहे. त्यांना मारहाण करतोय हे न ओळखण्या इतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही,’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
पोलीस व्हॅनमधून कानी पडल्या किंकाळ्या; ‘माझ्या जिवाला धोका..मला जेलरने मारलंय’
अर्णबला मारहान करू नका, चांगले जेवन द्या, त्याची काळजी घ्या; भाजपच्या सोमय्यांची जेलरला विनंती
‘ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे ‘चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा’
अण्णा हजारेंची महाविकास आघाडीवर टीका; ‘ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.