‘अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं’

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयाच्या तोडकामाच्या कारवाई प्रकरणी हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दणका दिला आहे. हायकोर्टानं बीएमसीची कारवाई अवैध ठरवली आहे. पालिकेने केलेली ही कारवाई सत्तेचा आणि अधिकारांचा दुरोपयोग असल्याचं हायकोर्टाने म्हटले.
याचाच धागा पकडत भाजपने राज्य सरकारवर टिका केली आहे. ‘अर्णब गोस्वामी पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचे थोबाड फुटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळे झाले,’ अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टिका केली आहे.
अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचे थोबाड फुटले…
कोर्टाचे ताशेरे…
महापालिकेची कारवाई बेकायदा. नुकसान भरपाई द्यावी लागणार..
वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळे…@OfficeofUT #KanganaRanaut pic.twitter.com/SpyKx9j3jt— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 27, 2020
दरम्यान, कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत म्हणत मुंबई महापालिकेने ऑफिसवर हातोडा मारला होता. मात्र ही कारवाई अवैध असल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दणका दिला आहे.
कार्यालय तोडल्यानंतर कंगणाने हायकोर्टात या प्रकरणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती याचा निर्णय आज कोर्टाने दिला. कंगणाचा ऑफीसवर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही अवैध आहे असे कोर्टाने सांगितले आहे.
तसेच महापालिकेने कंगणाला दिलेली नोटीस अवैध आहे त्यामुळे महापालिकेला भरपाई द्यावी लागणार आहे. कंगणाच्या विनंतीचा विचार करून नुकसानीचे मूल्यमापन केले जाईल आणि नंतर त्याविषयी निर्णय दिला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
स्वत:ला आवरा; कोर्टाने कंगनाची केली कानउघडणी
कोरोनावरील लस घेतली तरी सुटका नाहीच, ‘हे’ साईड इफेक्ट्स दिसणार; संशोधनातून सिद्ध
तुम्ही व्हिलन झालात म्हणून मी हिरो झाले न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पुन्हा तडाखा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.