‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतलं. जवळपास १५ दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची गर्दी झाली झाली होती. घरातून निघाल्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफाही होता.

याचाच धागा पकडत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राठोड यांच्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “जंगल मंत्री राठोड पोहरा गडावर शक्तिप्रदर्शन करणार असतील तर संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारने निरर्थक शक्ती कायद्याची टिमकी वाजवून नये,” असे ते म्हणाले.

तसेच पुढे बोलताना भातखळकर यांनी राठोड यांची तुलना गजा मारणेशी करत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हे मंत्री आहेत एवढाच फरक. समाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच आहे,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

काय केलं होतं गजा मारणेनं ?
टोळीयुध्दातून विरोधी गटातील दोघांचा खू.न केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षापासून मुंबईतील तळोजा जेलमध्ये असलेला कुख्यात गुं.ड गजानन मारणे उर्फ गजा मारणे याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे तब्बल दिडशे किलोमीटर गाड्यांची रॅली काढली. याबाबत गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर पोलिसांनी गु.न्हा दाखल केला आहे.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खू.न प्रकरणात गेल्या ६ वर्षांपासून गजा मारणे तुरूंगात होता. अखेर त्याची निर्दोष सुटका झाली आणि तो जेलबाहेर आला. गजा मारणे सुटणार असं समजताच त्याच्या समर्थकांनी थेट मुंबईतील तळोजा जेल गाठलं. गजा बाहेर येताच त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष केला.

तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन ४०० ते ५०० अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोथरुडमध्ये गजा मारणे व समर्थकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून हमराज चौकातील गणपती मंदिरात विनापरवाना आरती केली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…
दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना; पहा बाळाची पहिली झलक
मुलाचा विवाहसोहळा शाही थाटात करणं धनंजय महाडिकांना पडले महागात; वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.