हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे बंद करून दाखवावेत

 

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. या पत्राला उत्तर देत, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच विरोधी पक्षाकडूनही मुख्यमंत्र्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करून दाखवण्याचे धाडस दाखवावे, असे वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत द्यावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राजपालांना दिलेल्या उत्तरानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले, यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवरही विरोधी पक्षाने निशाणा साधला आहे. याच पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती.

वाह प्रशासन! महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरू झालीत, मग मंदिरे काय डेंजर झोनमध्ये आहेत का? काहीजण नियमावली लावण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या-

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार- अमृता फडणवीस

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.