सलमान खानच्या बहीणीवर प्रेम करण सोपे नाही; अतूल अग्निहोत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान आजच्या घडीला इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. चित्रपट असो किंवा टेलिव्हिजन सगळीकडे सलमान खानच्या नावाचा डंका वाजतो. सुपरहिट चित्रपट आणि त्यासोबतच टेलिव्हिजनवर बिग बॉससारखा हिट शो सलमानला खानचे स्टारडम आणखी वाढवतो.

सलमान खान लेखक सलीम खानचा मुलगा आहे. त्याच्यासोबतच त्याचे दोन्ही भाऊ देखील बॉलीवूडसोबत जोडलेले आहेत. पण त्याच्या बहीणी मात्र फिल्मी दुनियेपासून दुर असतात. अर्पिता आणि अलविरा दोघी बॉलीवूडपासून दुर असल्या तरी त्यांचे नवरे मात्र बॉलीवूडशी जोडलेले आहेत.

आर्पिताचा नवरा आयूष शर्मा बॉलीवूडमध्ये नाव कमवण्यासाठी मेहनत करत आहे. तर आलविरा खानचा नवरा बॉलीवूड अभिनेता आहे. अतूल अग्निहोत्रीने अनेक चित्रपट केले आहेत. पण हिरो म्हणून त्यांना अपयश आले. १९८३ मध्ये पसंत अपनी अपनी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारे अतून अग्निहोत्री आज खान कुटूंबाचा जावई आहे.

५१ वर्षांच्या अतूल अग्निहोत्रीने सर, अतीश, क्रांतीवीर, पसंत अपनी अपनी, चाची ४२०, क्रांतीसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तरीही त्यांना खास यश मिळाले नाही. अतूल अग्निहोत्री सध्या त्यांच्या फिल्मी करिअरमूळे नाही तर सलमान खानचे जीजू म्हणून ओळखले जातात.

सलमान त्यांच्यासोबतही काम केले आहे. ‘विरगती’ चित्रपटात सलमान आणि अतूल अग्निहोत्री एकत्र दिसले होते. काहीही केले तरी सलमान त्याच्या जीजूचे करिअर सांभाळू शकला नाही. म्हणून शेवटी अतूलने अभिनय सोडून निर्मिती क्षेत्रात प्रेवश केला.

अतूल अग्निहोत्रीने आत्तापर्यंत पाच चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यातल्या चार चित्रपटांमध्ये सलमानने काम केले होते. हॅलो, भारत, राधे, बॉडीगार्ड चित्रपटांची निर्मिती अतूलने केली होती. पण तरीही अतूल अग्निहोत्री इंडस्ट्रीमध्ये यश मिळवू शकले नाहीत.

अलविरा आणि अतूलची पहीली भेट ‘जागृती’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघांच्या मैत्रीत प्रेमात बदलत होती. त्यावेळी मात्र अतूलला सलमान खानची भीती वाटत होती. सलमान खानच्या बहीणीवर प्रेम करणे सोपे नाही. असे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सलमानला समजेल तेव्हा तो मला जिवंत ठेवणार नाही. असे अतूलला वाटत होते. पण सलमानने तसे काही केले नाही. खुप शांततेत सलमानने अलविरा आणि अतूलच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. फक्त त्यानेच नाही तर सगळ्या कुटूंबाने या गोष्टीचा स्वीकार केला होता.

१९९६ मध्ये अतूल आणि अलविराने लग्न केले होते. लग्नानंतर दोघांना दोन मुलं झाली. लवकरच दोघांची मोठी मुलगी अलिझे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अतूल अग्निहोत्री चित्रपटांमध्ये सक्रिय नसले तरी पत्नीसोबत मिळून व्यवसाय करतात आणि आपल्या कुटूंबासोबत खुप आनंदी आहेत.

महत्वाच्या बातम्या –
अमेरिकन टॉम अल्टरचा जन्म झाला होता भारतात; चित्रपटांमध्ये विदेशी खलनायक बनून अभिनेत्यांना दिला त्रास
बॉलीवूडच्या पार्टीमध्ये जाताना स्वत:ची खास दारु सोबत घेऊन जायचे शो मॅन राज कपूर
पैशांसाठी सगळं सहन करत होते, कपिल शर्माच्या त्या कृत्यावर सुमोना चक्रवर्तीचा मोठा खुलासा
सनी देओलवर भयंकर चिडले होते चंकी पांडे; न बोलता सेटवरुन गेले होते निघून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.