नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला, चार पोलीस गंभीर तर १० जखमी

मुंबई : नांदेड येथे शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दंगा झाला आहे. सदर दंगलीत चार पोलीस कर्मचारी गंभीर तर दहा जण अत्यवस्थ आहेत. हल्ला मोहल्ला कार्यक्रम काढू न दिल्यावरून पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह सात वाहनांची दंगेखोरांनी नासधूस केली आहे.

पोलीस अधीक्षक यांचे दोन गार्ड या दंगलीत जखमी झालेत. तर त्या ठिकाणी सदर घटनेचे चित्रीकरण करत असणाऱ्या व्यक्तीचे तीस ते चाळीस मोबाईलही फोडण्यात आलेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तासह गुरुद्वारा परिसरात लावण्यात आलेले सर्व बॅरिगेट्स तोडण्यात आलेत.

होळीनिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्या आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता.

मात्र सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. होळीनिमित्त शीख समाजाच्यावतीने हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. मात्र गुरुद्वाराच्या वतीने परवानगी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत हल्लाबोलची मिरवणूक काढली.

या दरम्यान पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

…तर लॉकडाऊन कराच; उद्धव ठाकरेंच्या विधानावर हरभजन सिंगचं वक्तव्य

…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीबद्दल भाजपाच्या बड्या नेत्याने केले मोठे विधान; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.