बांगलादेश (Bangladesh): बांगलादेशातील ढाका विभागातील तांगैल मध्ये चट्टोग्रामला जाणाऱ्या बसमध्ये एका २५ वर्षीय प्रवाशी महिलेवर बलात्कार करून लुटमार करण्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या हल्लेखोरांच्या सरदाराला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावली.(Bangladesh, Attack in Bus, Badal Kumar Chandra, Detective Branch, Mohammad Qaiser,)
ढाका-तांगैल महामार्गावरील तांगैलच्या मधुपूर उपजिल्हामधील रक्तीपारा भागात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. तांगैलचे एसपी सरकार एमडी कैसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ प्रवाशांसह ‘ईगल परिवहन’ बस मंगळवारी रात्री उशिरा कुश्तियाहून चट्टोग्रामकडे जात असताना हा गुन्हा घडला.
बस सिराजगंज जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबली होती. येथून बस निघाली तेव्हा ७ दरोडेखोर बसमध्ये चढले होते. ५-१० मिनिटांनी आणखी ४ जण बसमध्ये चढले. या प्रकरणातील आरोपींना तांगैल न्यायालयाने गुरुवारी पाच दिवसांची कोठडी सुनावली. ३२ वर्षीय आरोपी राजा मिया, जिल्ह्यातील कालिहाटी उपजिल्हातील रहिवासी आहे, तो एकेकाळी ढाका-तांगैल मार्गावर झटिका परिवहनचा चालक होता.
वरिष्ठ न्यायदंडाधिकारी बादल कुमार चंद्रा यांनी पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रँचच्या सात दिवसांच्या कोठडीच्या मागणीवर हा आदेश दिला. दरम्यान, बलात्कार पीडितेने न्यायालयात कलम २२ अंतर्गत जबाब दिला. न्यायालयाचे निरीक्षक तनवीर अहमद यांनी या प्रकरणाची तपासणी केली आहे.
यापूर्वी डिटेक्टिव्ह ब्रँचने (डीबी) राजा मियाला जिल्ह्यातील देवळा परिसरातून अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले. एसपी सरकार मोहम्मद कैसर यांनी सांगितले की, राजाने कबुली दिली की त्याने महिलेवर बलात्कार केला नाही. मात्र बलात्कार पीडितेची तांगैल सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेहेना परवीन यांनी सांगितले की, पीडितेच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत.
मंगळवारी (2 ऑगस्ट) रात्री उशिरा राजा आपल्या साथीदारांसह ईगल परिवहन बसमध्ये चढला आणि ती बस ताब्यात घेतली. त्यांनी बसमधील प्रवाशांचे पैसे, मोबाईल फोन व इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. तसेच बसमधील एका महिला प्रवाशावर बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिले.
बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मधुपूर येथील रोकटीपारा जम्मे मशिदीसमोरील वाळूच्या ढिगाऱ्यात आरोपींनी बस उलटून पळ काढला. बसमध्ये असलेल्या हेकमत अली यांनी या घटनेबाबत १० ते १२ अज्ञात लोकांविरुद्ध मधुपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. अलीच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चार जण प्रवासी म्हणून बसमध्ये चढले होते.
त्यांनी मास्क घातले होते आणि त्यांच्यापैकी एकाकडे बॅग होती. चौघेही मागच्या सीटवर बसून सतत फोनवर टाईप करत होते. सुमारे १५ मिनिटांनी आणखी पाच प्रवासी बसमध्ये चढले. त्यानंतर आणखी दोघे बसमध्ये चढले. त्यांनी चालकाला बस थांबवण्यास सांगितले. चालकाने नकार दिल्याने त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्यातील एकजण चालकाच्या सीटवर बसला.
अलीच्या म्हणण्यानुसार – आम्हाला काही समजण्याआधीच त्यातील १० जण प्रवाशांच्या सीटजवळ उभे राहिले. काहींनी पुरुषांना बांधण्यासाठी बसचे पडदे कापले. त्यांनी सर्व खिडक्या बंद करून दिवे मंद केले आणि प्रवाशांकडून पैसे, मोबाईल फोन आणि दागिने हिसकावले.
महत्वाच्या बातम्या
करिअर सुरू होताच संपलं, ICC ची स्टार क्रिकेटरवर कारवाई, या कारणामुळे १० महिन्यांसाठी केलं निलंबित
Rahul Gandhi: राहूल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; अक्षरशः रस्त्यावरून फरफटत नेले
Ujjwal nikam: सुप्रीम कोर्टातील घडामोडींनी एकनाथ शिंदे टेंशनमध्ये? मध्यरात्री घेतली उज्ज्वल निकमांची भेट